Price Cut! Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ फोन झा स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत| Tech News

Updated on 01-May-2024
HIGHLIGHTS

नुकतेच Redmi Note 13 Pro+ World Champions Edition भारतात लाँच

विद्यमान सीरीजचे तिन्ही फोन Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ स्वस्त

कंपनीने या सर्व फोनवर 1000 रुपयांची कपात केली आहे.

प्रसिद्ध Redmi Note 13 सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत नुकतेच Redmi Note 13 Pro+ World Champions Edition भारतात लाँच करण्यात आले आहे. या नवीन फोनच्या एंट्रीनंतर कंपनीने विद्यमान सीरीजचे तिन्ही फोन Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ स्वस्त केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने या सर्व फोनवर 1000 रुपयांची कपात केली आहे. यासोबतच फोनवर बँक कार्ड डिस्काउंट देखील मिळेल. नव्या किमती Redmi च्या अधिकृत साईटवर लाईव्ह झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सर्व फोन्सच्या नव्या किमती-

हे सुद्धा वाचा: Amazon Great Summer Sale ची तारीख जाहीर! भारी प्रोडक्ट्सवर मिळवा जबरदस्त Discount, होणार मोठी बचत। Tech News

Redmi Note 13 5G

Redmi Note 13 5G फोनचा 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, जो आता 17,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची डिस्काउंट ऑफरही उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर हा फोन 15,499 रुपयांना खरेदी करता येईल.

यात 8GB + 256GB व्हेरिएंट आहे, ज्याची किंमत आता 17,499 रुपये आहे. तर, 12GB + 256GB मॉडेल आता 19,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1500 रुपयांची बँक कार्ड सवलत देखील उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल माहितीसाठी क्लिक करा

Redmi Note 13 Pro 5G

Redmi Note 13 Pro 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट सवलतीनंतर 21,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 3000 रुपयांच्या बँक कार्ड सवलतीचा देखील समावेश आहे. तर, 8GB + 256GB मॉडेल 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. सवलतीनंतर 12GB + 256GB मॉडेलची किंमत 25,999 रुपये झाली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल माहितीसाठी क्लिक करा

Redmi Note 13 Pro+ 5G

Redmi Note 13 Pro+ 5G फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 3000 रुपयांच्या सवलतीनंतर 27,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 3000 रुपयांच्या बँक कार्ड सवलतीचा समावेश आहे. तर, 12GB + 256GB मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. 12GB + 512GB मॉडेलची किंमत डिस्काउंटनंतर 31,999 रुपये झाली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल माहितीसाठी क्लिक करा

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :