Redmi चा नवा फोन आज येणार भारतात ! 8GB रॅमसह केवळ 15 मिनिटांच्या चार्जवर फोन दिवसभर चालेल

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 20 Jul 2022
HIGHLIGHTS
  • Redmi K50i 5G स्मार्टफोन आज भारतात होणार लाँच

  • स्मार्टफोन 22 जुलैपासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होईल

  • Redmi Buds 3 Lite देखील आज लाँच होणार

Redmi चा नवा फोन आज येणार भारतात ! 8GB रॅमसह केवळ 15 मिनिटांच्या चार्जवर फोन दिवसभर चालेल
Redmi चा नवा फोन आज येणार भारतात ! 8GB रॅमसह केवळ 15 मिनिटांच्या चार्जवर फोन दिवसभर चालेल

Redmi K50i 5G आज दुपारी 12 वाजता भारतात दाखल होणार आहे. लाँच इव्हेंट Xiaomi इंडियाच्या Twitter, YouTube, Facebook आणि Instagram अकाउंटद्वारे तसेच त्याच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. हा स्मार्टफोन फँटम ब्लू, क्विक सिल्व्हर आणि स्टेल्थ ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. मागील अहवालानुसार, स्मार्टफोन 22 जुलैपासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग या फोनचे संभाव्य फीचर्स आणि किंमतीशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घेऊयात... 

हे सुद्धा वाचा : अप्रतिम युक्ती ! तुम्हाला कुणी WhatsAppवर ब्लॉक केल्यास कसे कळेल ? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

Redmi K50i ची अपेक्षित किंमत

Redmi K50i च्या बेस व्हेरिएंटची किंमत 24,000 रुपयांपासून सुरू होईल. तर हाय व्हेरिएंटची किंमत 28,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र, हा केवळ एक अंदाज आहे. फोनची नेमकी किंमत आज 12 वाजता लाँच झाल्यानंतरच कळेल.

Redmi K50i ची संभाव्य फीचर्स 

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारा डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 8100 SoC सह येईल, याबाबत आधीच पुष्टी झाली आहे. फोनमध्ये 5080mAh बॅटरी आहे, जी 67W टर्बो चार्जिंग सपोर्ट करेल. जो फक्त 15 मिनिटांच्या चार्जमध्ये पूर्ण दिवस चालेल, अशी अपेक्षा आहे. आगामी Redmi K50i 5G मध्ये 64-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील असेल.

Redmi Buds 3 Lite देखील आज लाँच होणार 

Xiaomi Redmi K50i सोबत इव्हेंटमध्ये Redmi Buds 3 Lite ट्रू वायरलेस इयरफोन देखील लाँच होऊ शकते. कंपनीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या टीझरनुसार, या इन-इअर TWS इयरफोनची किंमत अगदी परवडणारी असेल. कंपनीच्या स्वतःच्या प्री-लाँच टीझरनुसार, हे डिवाइस 18 तासांपर्यंत बॅटरीचे लाईफ, एन्व्हरमेंटल नॉइज कॅन्सिलेशन, USB टाइप-C फास्ट चार्जिंग आणि IP54 रेटिंगसह ऑफर केले जाईल.

Advertisement Redmi K50i Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 10 Aug 2022
Variant: 128 GB/6 GB RAM , 256 GB/8 GB RAM
Market Status: Launched

Key Specs

  • Screen Size Screen Size
    6.6" (1080 x 2460)
  • Camera Camera
    64 + 8 + 2 | 16 MP
  • Memory Memory
    128 GB/6 GB
  • Battery Battery
    5080 mAh
Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
redmi k50i camera redmi k50i pro redmi k50i price in india
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 64900 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 47999 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14999 | $hotDeals->merchant_name