अप्रतिम युक्ती ! तुम्हाला कुणी WhatsAppवर ब्लॉक केल्यास कसे कळेल ? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 19 Jul 2022
HIGHLIGHTS
  • WhatsApp वर तुम्ही ब्लॉक आहात का ? शोधून काढण्यासाठी खास युक्ती

  • ब्लॉक झाल्यास WhatsApp तुम्हाला अलर्ट देत नाही

  • ब्लॉक झाले आहात का? जाणून घेण्यासाठी पुढील टिप्स ट्राय करून बघा

अप्रतिम युक्ती ! तुम्हाला कुणी WhatsAppवर ब्लॉक केल्यास कसे कळेल ? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत
अप्रतिम युक्ती ! तुम्हाला कुणी WhatsAppवर ब्लॉक केल्यास कसे कळेल ? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

WhatsApp iOS आणि Android दोन्ही पर्यायांमध्ये नको असलेले कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्याचा पर्याय देतो. कधीतरी कुणी तुम्हालासुद्धा ब्लॉक करतात. मात्र,  WhatsApp कडे असा कोणताही फीचर नाही, जो तुम्ही ब्लॉक झाल्यास तुम्हाला अलर्ट करेल. पण तुम्हाला कुणी ब्लॉक केले आहे का ? हे शोधून काढायचे असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुम्हाला व्हॉट्सऍपवर कोणी ब्लॉक केले हे शोधण्याचे कोणतेही निश्चित मार्ग नाही, तरीसुद्धा खालील टिप्सद्वारे तुम्हाला याबाबत कल्पना नक्कीच येईल. 

हे सुद्धा वाचा : 10.36 इंच डिस्प्लेसह Oppo Pad Air भारतात लाँच, 7 GB रॅमसह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स

TIP 1 : लास्ट सीन / ऑनलाइन स्टेटस तपासा

एखाद्याचे ऑनलाइन स्टेटस किंवा लास्ट सीन आधी दिसत होते, मात्र आता दिसत नाहीये. तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असल्याची शक्यता आहे.

TIP 2 : प्रोफाइल फोटो तपासा

जर एखाद्या कॉन्टॅक्टचा प्रोफाईल फोटो अचानक तुम्हाला दिसत नसेल. तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता आहे.

TIP 3 : मॅसेज डिलिव्हरी स्टेटस

जर तुम्हाला शंका असेल की, कोणीतरी तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले. तर त्यांना मेसेज पाठवा. मॅसेज न गेल्यास कॉन्टॅक्टने तुम्हाला ब्लॉक केले आहे किंवा त्यांचा इंटरनेट देखील बंद असू शकतो. परंतु, एक किंवा दोन दिवसांनंतरही मॅसेज न गेल्यास, पुढील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

TIP 4 : कॉल करून बघा

जर तुम्हाला शंका असेल की, कोणीतरी तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले. त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ब्लॉक असल्यास तुमचा कॉल त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. जर व्हॉट्सऍप कॉलमध्ये 'रिंगिंग' स्टेटस दिसत नसेल, तर तुम्ही ब्लॉक असू शकता.


 TIP 5 : एक WhatsApp ग्रुप तयार करा

तुम्ही व्हॉट्सऍप वर ब्लॉक आहात का? हे जाणून घेण्यासाठी तर एक ग्रुप तयार करा. जर तुम्हाला "तुम्ही हा संपर्क जोडण्यासाठी अधिकृत नाही" असा मेसेज आला. तर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले असू शकते.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
whatsapp my whatsapp whatsapp download new whatsapp
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements