6000mAh Battery with Realme P3 5G Launched in india price under Rs 20000
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme आपल्या Realme P लाइनअपमध्ये नवे स्मार्टफोन जोडणार आहे. येत्या 19 मार्च 2025 रोजी रिअलमीच्या P-सिरीजमध्ये एक नवीन Realme P3 5G फोन जोडला जाणार आहे. मात्र, लाँच होण्यापूर्वीच डिव्हाइसची मुख्य फीचर्स कंपनीने उघड केली आहेत. याशिवाय, हँडसेटमध्ये उपलब्ध असलेल्या AI फीचर्सशी संबंधित अपडेट देखील देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, Realme P3 5G फोनची अपेक्षित किंमत देखील उघड झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर तपशील-
Also Read: Samsung च्या लेटेस्ट प्रीमियम फोनवर 11,000 रुपयांच्या Discount, खरेदीपूर्वी तपासा टॉप 3 फीचर्स
Realme ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करत आगामी Realme P3 5G फोनबद्दल माहिती दिली आहे. या फोनची अर्ली बर्ड सेल 19 मार्च रोजी 6PM ला सुरु होईल, असे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. हा फोन 14,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तुम्ही खालील पोस्टमध्ये पाहू शकता, की फोनची ही किंमत जुन्या Realme P1 प्रमाणेच असू शकते. तुम्हाला या किमतीत आगामी मॉडेलमध्ये अनेक फीचर्स आणि अनेक पॉवर मिळेल.
Realme P3 5G हा Realme चा भारतात येणारा पहिला फोन आहे, जो Snapdragon 6 Gen 4 ने सुसज्ज असेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये IP69 रेटिंगसह AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम सपोर्ट आहे. यामुळे, वापरकर्त्यांना डिव्हाइसवर एक चांगला गेमिंग अनुभव मिळेल. यामध्ये, BGMI सारखे हेवी गेम देखील स्मूथ चालतील.
त्याबरोबरच लीकनुसार, नवीन स्मार्टफोनमध्ये GT बूस्ट फीचर देखील दिले जाईल, ज्याद्वारे वापरकर्ते AI मोशन कंट्रोल आणि AI अल्ट्रा टच कंट्रोल सारख्या फीचर्सचा वापर करू शकतील. एवढेच नाही तर, चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये अँटेना अॅरे मॅट्रिक्स 2.0 देखील उपलब्ध असेल. फोटो क्लिक करण्यासाठी 50MP कॅमेरा देखील मिळेल. मात्र, फोनची खरी किंमत आणि कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.