Realme P1 5G VS Moto G64 5G: नुकतेच लाँच झालेल्या लेटेस्ट Affordable स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त स्पर्धा, कोण आहे बेस्ट? Tech News

Updated on 18-Apr-2024
HIGHLIGHTS

Moto G64 5G आणि Realme P1 5G दोन स्वस्त स्मार्टफोन अलीकडेच लाँच झाले आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन्स ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतात.

फास्ट चार्जिंगसह येणारे स्मार्टफोन्स युजर्सना जास्त आकर्षित करतात.

अलीकडेच भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बजेट सेक्शनमध्ये सादर केले गेले आहेत. होय, आम्ही नव्या Moto G64 5G आणि Realme P1 5G स्मार्टफोन्सबद्दल बोलत आहोत. बजेट सेगमेंटमध्ये या कंपन्यांनी ग्राहकांसाठी जबरदस्त पर्याय सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत केवळ 1000 रुपयांचा फरक आहे. या लेखात आम्ही दोन्ही बजेट स्मार्टफोनची तुलना करून सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात सर्व तपशील.

Realme P1 5G VS Moto G64 5G किंमत

Realme ने 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Realme P1 भारतात लाँच करण्यात आला आहे. मात्र, ब्रँड त्याच्या पहिल्या सेलमध्ये 2000 रुपयांची लाँच सवलत देत आहे. त्याबरोबरच, Moto G64 ची किंमत 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 23 एप्रिलपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme P1 5G VS Moto G64 5G चे स्पेक्स

डिस्प्ले

Realme फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश दर देखील ऑफर करतो. तर, Moto G64 मध्ये 6.5-इंच लांबीचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, AMOLED डिस्प्ले हा IPS डिस्प्लेपेक्षा नेहमीच चांगला असतो, असे म्हटले जाते. यात अधिक रंग आहेत, कमी बॅटरीचा वापर होतो, अधिक रिस्पॉन्सिव्ह आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये चांगले आहे.

प्रोसेसर

Moto G64 आणि Realme P1 दोन्ही प्रोसेसरच्या समान सिरीजद्वारे समर्थित आहेत. Motorola ने भारतातील पहिला MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर आपल्या फोनमध्ये वापरला आहे. तर, Realme ने आपला फोन MediaTek डायमेंसिटी 7050 चिपसेटने सुसज्ज केला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Dimensity 7025 चा क्लॉक स्पीड 2.5 GHz आहे. तर, Dimensity 7050 2.6 GHz च्या किंचित जास्त क्लॉक स्पीडवर काम करतो.

कॅमेरा

हे दोन्ही स्मार्टफोन्स ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतात. Realme ने त्याच्या डिव्हाइसमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर प्रदान केला आहे. तर, दुसरीकडे, Moto च्या फोनमध्ये ‘OIS’ समर्थनासह 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल. याशिवाय, या फोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड लेन्स देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16MP सेल्फी शूटर उपलब्ध आहे.

बॅटरी

Moto G64 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर दुसरीकडे, Realme P1 5G मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, फास्ट चार्जिंगसह येणारे स्मार्टफोन्स युजर्सना जास्त आकर्षित करतात.

अशाप्रकारे दोन्ही स्मार्टफोन जबरदस्त आणि अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतात. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य स्मार्टफोनची निवड करू शकता.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :