भारीच की! Realmeचा स्वस्त स्मार्टफोन, मिळेल फुल चार्ज केल्यावर 36 दिवस टिकणारी बॅटरी आणि 1TB पर्यंत स्टोरेज

भारीच की! Realmeचा स्वस्त स्मार्टफोन, मिळेल फुल चार्ज केल्यावर 36 दिवस टिकणारी बॅटरी आणि 1TB पर्यंत स्टोरेज
HIGHLIGHTS

Realme Narzo 50i Prime नवीन स्मार्टफोन लाँच

नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत अंदाजे 11,100 रुपये

स्मार्टफोनमध्ये 36 दिवस टिकणारी बॅटरी उपलब्ध

ज्यांना परवडणारा फोन हवा आहे, त्यांच्यासाठी Realmeने आपला नवीन फोन Realme Narzo 50i प्राइम लाँच  केला आहे. यात सिंगल रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, ऑक्टा-कोर चिपसेट आणि 1TB पर्यंत स्टोरेज एक्सपेन्शन  सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशन आणि दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉचसह 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन भारतात लाँच झालेल्या Realme C30 सारखा दिसतो.

हे सुद्धा वाचा : 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Thomson चा स्मार्ट टीव्ही लाँच, सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Realme narzo 50i प्राइमची किंमत

सध्या, कंपनीने ते चीनमधील ऑनलाइन रिटेल सेवा AliExpress वर लाँच केले आहे. Realme Narzo 50i प्राइम स्मार्टफोनची AliExpress वर बेस 3GB+32GB व्हेरिएंटची किंमत $142 म्हणजेच अंदाजे 11,100 रुपये आहे. तर, 4GB+64GB व्हेरिएंट ऑनलाइन रिटेल वेबसाइटवर $157 म्हणजेच अंदाजे 12,300 रुपये आहे. नवीन Realme स्मार्टफोन 27 जूनपासून ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme Narzo 50i Prime बद्दल माहिती

Realme ने फेसबुक पोस्टद्वारे स्मार्टफोनची घोषणा केली, परंतु स्मार्टफोनचे फीचर्स उघड झाले नाहीत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, Narzo 50i Prime Android 11 (Go Edition) वर चालतो आणि 6.5-इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे. फोनला एक ऑक्टा-कोर चिपसेट मिळतो, जो Unisoc T612 असल्याचे सांगितले जात आहे. Narzo स्मार्टफोन 4GB पर्यंत RAM सह येतो.

फोटोग्राफीसाठी, Realme Narzo 50i Prime मध्ये LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सेल सिंगल रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5-मेगापिक्सेल फ्रंट शूटर आहे. हँडसेटमध्ये 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे. यामध्ये स्टोरेज मायक्रो SD कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते. फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/A-GPS आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 36 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करण्यासाठी रेट केलेली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo