तुम्ही कमी बजेटमध्ये सर्वोत्तम फीचर्ससह स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. फ्रेंच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Thomson ने भारतात आपला नवीन Alpha सीरीज स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीनतम स्मार्ट टीव्ही 32 इंच साईझचा आहे. टीव्हीची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याची विक्री 26 जूनपासून सुरू होईल. तुम्हाला टीव्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. खास गोष्ट म्हणजे तुम्ही हा टीव्ही 10% च्या इन्स्टंट डिस्काउंटसह देखील खरेदी करू शकता. सवलतीसाठी, तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील. Thomson या बजेट स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देत आहे. त्यात दिलेल्या 30 वॉटच्या स्पीकरमुळे तुम्हाला अगदी सिनेमागृहात बसल्याचा फील येईल.
टीव्हीमध्ये कंपनी 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 32-इंच लांबीचा HD रेडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 400 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. बेझल-लेस डिझाइनसह या टीव्हीमध्ये, तुम्हाला 16:09 ऑस्पेक्ट रेशयो आणि 60Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. कंपनीचा हा टीव्ही 178 डिग्रीच्या व्ह्यूइंग अँगलसह येतो.
थॉमसनने हा टीव्ही 512MB रॅम आणि 4GB इंटर्नल स्टोरेजसह लाँच केला आहे. Linix ओएसवर काम करणाऱ्या या टीव्हीमध्ये क्वाड-कोर A35x4 चिपसेट प्रोसेसर म्हणून देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी टीव्ही मध्ये MALI G31 देखील आहे.
दमदार आवाजासाठी, कंपनी या टीव्हीमध्ये दोन 30-वॉट बॉक्स स्पीकर देत आहे. हे स्पीकर्स सराउंड साउंड टेक्नॉलॉजीसह येतात. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, 3HDMI आणि 2 USB पोर्ट व्यतिरिक्त, तुम्हाला TV मध्ये हेडफोन जॅक देखील मिळेल. या टीव्हीमध्ये तुम्हाला Amazon Prime, Sony Liv आणि Zee5 सारखे OTT ऍप्स इन-बिल्ट मिळतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile