पहिल्या सेलमध्ये 29,999 रुपयांचा Realme फास्ट चार्जिंग फोन फक्त रु. 6,099 मध्ये खरेदी करा

Updated on 23-Sep-2022
HIGHLIGHTS

Realme GT Neo 3T ची पहिली सेल आज

Realme आणि Flipkart नवीन GT सिरीज स्मार्टफोनवर प्रचंड सूट

बँक ऑफर आणि लाँच ऑफरसह 7000 रुपयांच्या मोठ्या सवलतीवर उपलब्ध

Realme ने गेल्या आठवड्यात भारतात Realme GT Neo 3T हा GT सिरीजमधील मध्यम कॅटेगरीचा फोन म्हणून लाँच केला. हा फोन फेस्टिव्ह सीझनच्या सेलच्या आधी लाँच करण्यात आला होता. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल आजपासून सर्वांसाठी खुला झाला आहे आणि या सेलमध्ये Realme GT Neo 3T आज पहिल्यांदाच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे सुद्धा वाचा : VIVO चा दमदार फोन परवडणाऱ्या किमतीत लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनेक उत्कृष्ट फीचर्स

पहिल्या सेलसाठी, Realme आणि Flipkart नवीन GT सिरीज स्मार्टफोनवर प्रचंड सूट देत आहेत. Realme GT, ज्याचे मूळ व्हेरिएंट 29,999 रुपये आहे, बँक ऑफर आणि लाँच ऑफरसह 7000 रुपयांच्या मोठ्या सवलतीवर उपलब्ध असेल. 

Realme GT Neo 3T ची पहिली सेल आणि लॉन्च ऑफर

Realme GT Neo 3T आता Flipkart आणि realme.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ICICI आणि Axis Bank क्रेडिट कार्डसह Flipkart वरून फोन खरेदी केल्यावर खरेदीदार 1,500 रुपयांची त्वरित सूट घेऊ शकतात. याशिवाय, फ्लिपकार्ट एक्सचेंजवर 19,900 रुपयांची सूट देखील देत आहे, ज्यामुळे किंमत 6,099 रुपयांपर्यंत कमी होईल. 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी  29,999 रुपये, 8GB + 128GB ची किंमत 31,999 रुपये आणि  8GB + 256GB ची किंमत 33,999 रुपये आहे. 

Realme GT Neo 3T फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

GT Neo 3T मध्ये 6.62-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन  देखील आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. Realme GT Neo 3T 5000mAh बॅटरी युनिट आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. Neo 3T ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP प्रायमरी शूटर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 2MP मॅक्रो सेन्सर आणि LED फ्लॅश आहे. GT सिरीज स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट शूटर आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :