Realme Narzo N55
Realme स्मार्टफोन यूजर्ससाठी एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीवर भारतीयांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. खरं तर, एका वापरकर्त्याचा दावा आहे की, कंपनीने ‘एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस’ सुविधा लागू केली आहे, जे वापरकर्त्यांचे कॉल लॉग, SMS आणि लोकेशन इ. संवेदनशील माहिती ट्रॅक करते. ही सुविधा धोकादायक आहे आणि आपोआप स्मार्टफोनमध्ये सेटअप होते, अशी माहिती मिळाली आहे. यानंतर आता Realme कंपनी सरकारच्या निशाण्यावर आली आहे.
या फीचरमध्ये सर्व्हिसेसच्या नावाखाली कंपनी वापरकर्त्यांची डिव्हाइसबद्दल काही माहिती, ऍप्स, लोकेशन, कॅलेंडर इव्हेंट्स, SMS इ. डेटा कलेक्ट करते. या प्रकरणात, Realmeने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
Realme ने फोनवर ‘एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस’ पर्याय डीफॉल्टनुसार सक्षम केला आहे, असा ट्विटर वापरकर्त्यांचा दावा आहे. जो वर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्यांना कॉल लॉग, SMS आणि लोकेशन इ. डेटा ट्रॅक करू शकतो. हे फिचर ऑन करण्यासाठी वापरकर्त्याची परवानगी घेतली जात नाही.
काही विश्वसनीय वृत्तानुसार, एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस हे फिचर बाय डीफॉल्ट ऑन आहे. सर्वात धोकादायक म्हणजे हे फिचर ऑफ करण्याचा पर्याय देखील देण्यात आलेला नाही. दरम्यान, केवळ Realme स्मार्टफोन्सच नाही. तर, OnePlus, Oppo, Vivo आणि iQoo सारख्या बाजारातील इतर Android स्मार्टफोनमध्ये देखील ही सेवा बाय डिफॉल्ट ऑन आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे फिचर डिसेबल करण्याची प्रक्रिया पुढे आली आहे. लक्षात घ्या की, एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये डिसेबल केल्यास काही ऍप्स आणि सेवा अनुपलब्ध होऊ शकतात.
> यासाठी सेटिंग्ज वर जा. > त्यांनतर अतिरिक्त सेटिंग्ज वर क्लिक करा. > सिस्टम सर्व्हिसेस सिलेक्ट करा. > एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस अनचेक करा. > आता तुमचा फोन रीस्टार्ट करा. अशाप्रकारे या प्रक्रियेद्वारे ही सेवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये अक्षम केली जाईल.