Realme चा स्वस्त फोन आज लाँच होणार, मिळेल OnePlus 10R सारखे लुक आणि 5000mAh बॅटरी

Updated on 20-Jun-2022
HIGHLIGHTS

REALME चा स्वस्त फोन आज लाँच होणार

स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल

स्मार्टफोनची किंमत जवळपास 12,000 रुपये असण्याची शक्यता

Realme सोमवारी म्हणजेच आज 20 जून रोजी भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Realme C30 लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन दुपारी 12.30 वाजता लाँच केला जाईल आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. लाँच होण्यापूर्वीच फोनचे फोटो आणि बहुतेक फीचर्स समोर आले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन, तुम्हाला OnePlus 10R ची आठवण करून देईल. चला जाणून घेऊयात फोनबाबत अधिक माहिती… 

Realme C30 ची किंमत

Realme C30 स्मार्टफोन Android 12 Go Edition वर आधारित Realme UI वर काम करेल. हा स्मार्टफोन लेक ब्लू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. हँडसेट भारतासाठी 2GB + 32GB आणि 3GB + 32GB मेमरी कॉन्फिगरेशनमध्ये येण्याची अपेक्षा आहे. येथे त्याची किंमत जवळपास 12,000 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  हे सुद्धा वाचा : अप्रतिम डील ! Samsungचा 1 लाख रुपयांचा फोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, जाणून घ्या कसं ?

Realme C30 चे स्पेसिफीकेशन्स

Realime C30 स्मार्टफोनमध्ये UNISOC T612 प्रोसेसर दिला जाईल. परफॉर्मन्समध्ये हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 665 सारखा राहू शकतो. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यात फ्लॅट एजसह वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. मागील बाजूस, स्ट्रिप सारखी डिझाईन आणि LED फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा आहे. मागील कॅमेराचा आकार बराच मोठा ठेवण्यात आला आहे. हा कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा असणार आहे.

फोनमध्ये 6.58-इंच लांबीचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले मिळणार आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी दिवसभर चालते. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते आणि मायक्रो-USB चार्जिंग पोर्टसह येते. फोनमध्ये तळाशी 3.5 मिमी हेडफोन जॅक, उजवीकडे व्हॉल्यूम आणि पॉवर बटन्स आणि डावीकडे सिम कार्ड स्लॉट आहे. फोनचे वजन 182 ग्रॅम आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :