Price Cut! लेटेस्ट Realme 13+ 5G फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत

Updated on 09-Apr-2025
HIGHLIGHTS

Realme 13+ 5G च्या किमतीत मोठी कपात झाली आहे.

फोनच्या किमतीत 2000 रुपयांची कपात नोंदवण्यात आली आहे.

Realme 13+ 5G फोनमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. जर तुम्ही एक Powerful 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Realme 13+ 5G च्या किमतीत कपात झाली आहे. ही कपात मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. हा फोनच्या किमतीत 2000 रुपयांची कपात नोंदवण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme 13+ 5G फोनची नवीन किंमत, ऑफर आणि सर्व तपशील-

Also Read: Launched! लेटेस्ट Realme Narzo 80 Pro आणि Narzo 80X भारतात लाँच, पहा किंमत आणि टॉप फीचर्स

Realme 13+ 5G ची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Realme कंपनीने फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी केली आहे. Realme 13+ 5G फोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट आता 26,999 रुपयांऐवजी फक्त 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. 8GB रॅम+ 256GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर रिटेल आउटलेटवर उपलब्ध असेल आणि तुम्ही रिटेलरने दिलेल्या बँक ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. ही तात्पुरती किंमत कपात ऑफर 8 एप्रिल ते 20 एप्रिल 2025 पर्यंत लागू असेल.

Realme 13+ 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Realme 13+ 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+ सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. विशेष म्हणजे यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि रेनवॉटर स्मार्ट टच सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन IP65 प्रमाणपत्रासह येतो, ज्यासह तुम्हाला पाणी आणि धूळपासून संरक्षण मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी प्रोसेसर आहे.

याव्यतिरिक्त, या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP सोनी LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 2MP मोनो लेन्सचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mA बॅटरी देण्यात आली आहे. ते चार्ज करण्यासाठी, त्यात 80W अल्ट्रा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :