Realme 10 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच, बघुयात काय मिळेल खास…

Realme 10 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच, बघुयात काय मिळेल खास…
HIGHLIGHTS

Realme 10 Pro+, Realme 10 Pro नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल

दोन्ही फोनमध्ये 5G सपोर्ट आहे आणि दोन्ही फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi आहे.

फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 18,500 रुपये

Realme ने देशांतर्गत बाजारात Realme 10 Pro+ आणि Realme 10 Pro लाँच केले आहेत. Realme 10 Pro + आणि Realme 10 Pro दोन्ही फोनमध्ये 5G सपोर्ट आहे आणि दोन्ही फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi आहे. Realme 10 Pro+ मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2,160Hz प्लस विड्थ मॉड्युलेशन PWM डीमींग आणि 800 nits ब्राइटनेससह 6.7-इंच कर्व  AMOLED डिस्प्ले आहे. जाणून घेऊयात सविस्तर… 

हे सुद्धा वाचा : नव्या फिचरद्वारे WhatsApp वर चॅट करणे झाले अधिक मजेशीर! फेसबुक आणि ट्विटर सारखे पोल करता येईल..

Realme 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन

Realme 10 Pro+ मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 61 डिग्री कर्व आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट  120Hz आहे आणि त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 प्रोसेसरसह Mali-G68 GPU आणि स्टँडअलोन 5G आहे. याव्यतिरिक्त, Realme 10 Pro+ मध्ये Android 13 सह Realme UI 4.0 आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. 

त्याबरोबरच, Realme 10 Pro + मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 108 मेगापिक्सेल आहे, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम आहे. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 

Realme 10 Pro चे स्पेसिफिकेशन

Realme 10 Pro मध्ये 6.72-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. हे Snapdragon 695 5G प्रोसेसर द्वारे समर्थित आहे, जे 12GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह जोडलेले आहे. या फोनमध्ये 108 मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरे आहेत आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची आहे. समोर आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये सुद्धा 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच, यामध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.

Realme 10 Pro+, Realme 10 Pro ची किंमत

Realme 10 Pro + ची सुरुवातीची किंमत 1,699 चीनी युआन म्हणजे सुमारे 19,500 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि हा फोन नाईट, ओशन आणि स्टारलाइट कलरमध्ये खरेदी करता येईल. तर, Realme 10 Pro ची सुरुवातीची किंमत 1,599 चीनी युआन म्हणजेच सुमारे 18,500 रुपये आहे. हे नाईट, ओशन आणि स्टारलाइट कलरमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकते. हे फोन लवकरच भारतात  दाखल होणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo