नव्या फिचरद्वारे WhatsApp वर चॅट करणे झाले अधिक मजेशीर! फेसबुक आणि ट्विटर सारखे पोल करता येईल..

नव्या फिचरद्वारे WhatsApp वर चॅट करणे झाले अधिक मजेशीर! फेसबुक आणि ट्विटर सारखे पोल करता येईल..
HIGHLIGHTS

WhatsApp वर आले नवीन पोल फिचर

आता यावर देखील फेसबुक आणि ट्विटरसारखे पोलिंग करता येईल.

जाणून घ्या, व्हाट्सऍप पोल कसे वापरता येईल.

WhatsApp ने आपले पोल फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींवर लाँच केले आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या या नवीन फिचरच्या मदतीने, तुम्ही काही सोप्या स्टेप्समध्ये WhatsApp पोल सुरू करू शकता. ज्यामध्ये तुमचे मित्र किंवा काँटॅक्ट्स पोल करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सऍपने ट्विट केले की, 'पोल फिचर' आले आहे. आता ग्रुप चॅटमध्ये निर्णय घेणे सोपे आणि अजून मजेदार झाले आहे.

हे सुद्धा वाचा : BSNL ने लाँच केले 'हे' मस्त प्लॅन लाँच केले, Jio-Airtel पडले मागे, बघा किंमत आणि बेनिफिट्स

व्हॉट्सऍप पोल म्हणजे काय?

नावाप्रमाणेच तुम्ही व्हॉट्सऍपवर पोल फीचरद्वारे मतदान सुरू करू शकता. हे वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर केले जाऊ शकते. वापरकर्ते मतदानामध्ये जास्तीत जास्त 12 पर्याय प्रविष्ट करू शकतात. यामध्ये वापरकर्ता एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकतो. तथापि, हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुम्हाला iOS आणि Android दोन्हीवर WhatsApp नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे.

 

 

व्हाट्सऍप पोल कसे करता येईल?

> हे फीचर वापरण्यासाठी WhatsAppवर ग्रुप किंवा वैयक्तिक चॅटवर जा.

> iOS साठी, चॅटमध्ये, चॅट बॉक्सच्या पुढील + चिन्हावर क्लिक करा. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असल्यास, चॅट बॉक्सच्या शेजारील पेपरक्लिक आयकॉन निवडा.

> दोन्ही प्रकरणांमध्ये, पोल स्क्रीनवर दिसत असलेल्या मेनूच्या बॉटमला असेल.

> त्यावर क्लिक करा आणि एक नवीन मेनू उघडेल.

> आता येथे पोल प्रश्न आणि उत्तर पर्याय टाइप करा.

> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास फक्त सेंडवर क्लिक करा.

मतांची संख्या पाहण्याचा पर्याय देखील पोलच्या बॉटमला दिसेल. व्हॉट्सऍप कोणत्याही प्रतिसादासह मतांची संख्या दर्शवेल. जवळजवळ सर्व वापरकर्ते व्हॉट्सऍपवर ग्रुप फीचर वापरतात. त्यामुळे, नवीन पोल फिचर  वापरकर्त्यांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo