SAMSUNG GALAXY F55 5G
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने मागील वर्षी आपला विगन लेदर फिनिशसह येणारा Samsung Galaxy F55 5G फोन सादर केला होता. आता जवळपास एका वर्षानंतर कंपनी या फोनवर, सर्वात मोठी सूट देऊ करत आहे. होय, सध्या Samsung Galaxy F55 5G फोन सध्या तब्बल 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळत आहे. जर तुम्हाला देखील हा Samsung Galaxy F55 5G फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे खरेदी करू शकता. जाणून घेऊयात किंमत आणि सवलती-
Also Read: अखेर Samsung Galaxy M16 आणि Galaxy M06 5G भारतात लाँच, पहा किंमत आणि टॉप फीचर्स
SAMSUNG Galaxy F55 5G फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 23,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या हा फोन 8000 रुपयांच्या सवलतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनवर ICICI बँक कार्डद्वारे 3000 रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. अधिक ऑफर्स आणि माहितीसाठी Flipkart ला भेट द्या. लक्षात घ्या की, ऑफर्स जवळपास बदलत राहतील.
आकर्षक Samsung Galaxy F55 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम असे दोन रॅम पर्याय देण्यात आले आहेत. तसेच, 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज पर्याय सुद्धा देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी, SAMSUNG Galaxy F55 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, सेटअपमध्ये 8MP चा सेकेंडरी आणि 2MP चा तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आले आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.