Poco X5 Proची लाँच डेट कन्फर्म! ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल

Poco X5 Proची लाँच डेट कन्फर्म! ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल
HIGHLIGHTS

POCO X5 Pro 5G लवकरच भारतात दाखल होणार

फोन 6 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता लॉन्च होईल.

हा फोन चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे.

Poco X5 Pro ची लॉन्च डेट कन्फर्म झाली आहे. फोन 6 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता लॉन्च होईल. Poco X5 Pro स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो. Poco X5 Pro स्मार्टफोन क्वालकॉम प्रोसेसर सपोर्टसह येईल. त्याच्या मागील पॅनलवर 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जाणून घेऊया Poco X5 Pro स्मार्टफोनमध्ये काय मिळेल खास ?

हे सुद्धा वाचा : OPPO F21 Pro फोन Flipkart वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध, बघा ऑफर

POCO X5 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

POCO X5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह ऑफर केला जाऊ शकतो. आगामी POCO X5 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसर सपोर्ट म्हणून दिला जाऊ शकतो.  हा फोन चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 6GB RAM 64GB स्टोरेज, 6GB RAM 128GB स्टोरेज तसेच 8GB RAM 128GB स्टोरेज आणि 8GB RAM 256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल.यात Adreno 642L GPU सपोर्ट मिळेल. 

फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याचा मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा असेल. याशिवाय 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर दिला जाईल. फोनच्या फ्रंटला 16MP कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

POCO X5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. 67W वायर्ड चार्जरच्या मदतीने हे चार्ज करता येते. याशिवाय फिंगरप्रिंट स्कॅनर, मायक्रो SD कार्ड आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक सपोर्ट दिला जाईल. फोन ड्युअल सिम सपोर्टसह येईल. POCO X5 Pro स्मार्टफोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट दिला जाऊ शकतो. जो MIUI 14 इंटरफेससह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo