HIGHLIGHTS
OPPO F21 PROवर मिळतेय भारी सूट
फ्लिपकार्टवर ही खास ऑफर उपलब्ध
एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदीवर 19,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
तुम्ही OPPO F21 Pro वर फ्लिपकार्ट ऑफर पाहिली आहे का? खरं तर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म OPPO F21 Pro वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. स्मार्टफोनची मूळ किंमत 27,999 रुपये आहे, तर फ्लिपकार्टवर हा फोन 20,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारे, तुम्हाला फोनवर 7,000 रुपयांची सूट मिळत आहे.
Surveyहे सुद्धा वाचा : Vodafone Idea ने आणला 99 रुपयांचा नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन, बघा काय मिळेल खास…
कोटक बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10% सूट म्हणजेच 760 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे. HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटवर 2000 रुपयांची सूट आणि या ऑफरसोबत SBI कार्ड ऑफर देखील दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदीवर 19,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Oppo F21 Pro मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आली आहे. Oppo F21 Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा, आणखी 2MP मायक्रोस्कोप लेन्स आणि 2MP मोनोक्रोम लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा मिळत आहे.
Oppo F21 Pro कनेक्टिव्हिटीसाठी USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय डिवाइसला ब्लूटूथ आणि Wi-Fi सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, ज्याला 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 4G सपोर्टसह आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile