जबरदस्त फीचर्ससह Poco X5 5G ची आज पहिली विक्री, मिळतायेत ‘या’ भारी ऑफर्स

जबरदस्त फीचर्ससह Poco X5 5G ची आज पहिली विक्री, मिळतायेत ‘या’ भारी ऑफर्स
HIGHLIGHTS

Poco X5 5G ची विक्री आजपासून सुरु

Poco X5 5G Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पहिल्या सेलमध्ये फोनची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये

Poco चा नवीन फोन POCO X5 5G पहिल्यांदाच आज म्हणजेच 21 मार्च रोजी विक्रीसाठी उपलब्ध आहे. POCO X5 5G ची विक्री आज दुपारी 12 वाजतापासून फ्लिपकार्टद्वारे सुरु झाली आहे. POCO X5 5G भारतात गेल्या आठवड्यातच लाँच करण्यात आला आहे. चला तर मग या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि सर्व फीचर्सबद्दल माहिती घेऊयात

हे सुद्धा वाचा : मुंबईकरांना Apple देणार सुखद धक्का ! ग्राहकांची मोठी चिंता मिटली, वाचा डिटेल्स

Poco X5 5G किंमत

6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Poco X5 5G ची किंमत 19,999 रुपये आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 20,999 रुपये आहे. परंतु पहिल्या सेलमध्ये बँक ऑफरसह, पहिला व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि दुसरे मॉडेल 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Poco X5 5G Flipkart वरून सुपरनोव्हा ग्रीन, वाइल्डकॅट ब्लू आणि जग्वार ब्लॅक रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Poco X5 5G चे स्पेसिफिकेशन

Poco X5 5G ला Android 12 आधारित MIUI 13 मिळेल. याशिवाय, फोनमध्ये 6.67-इंच लांबीची फुल HD प्लस AMOLED स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS आणि NFC उपलब्ध आहेत. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. Poco X5 5G चे एकूण वजन 189 ग्रॅम आहे.

त्याबरोबरच, Poco X5 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सल्सची आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. समोर 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo