Poco F6 5G Vs Realme GT 6T: दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमधून कोण आहे तुमच्यासाठी Best?

Poco F6 5G Vs Realme GT 6T: दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमधून कोण आहे तुमच्यासाठी Best?
HIGHLIGHTS

Poco F6 5G आणि Realme GT 6T स्मार्टफोन्स भारतात नुकतेच लाँच झाले.

Poco F6 5G आणि Realme GT 6T स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

Poco F6 5G आणि Realme GT 6T स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतात.

Poco F6 5G Vs Realme GT 6T: भारतीय टेक बाजारपेठेत नुकतेच दोन लेटेस्ट स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. होय, Realme GT 6T स्मार्टफोन 22 मे 2024 रोजी भारतात लाँच झाला. तर, POCO F6 गुरुवारी म्हणजेच 23 मे 2024 रोजी लाँच करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. पण खरेदी करण्यासाठी कोणता फोन ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट? बघुयात दोन्ही फोनचे टॉप फीचर्स-

Also Read: 12GB RAM आणि 50MP कॅमेरासह POCO F6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Poco F6 5G आणि Realme GT 6T ची किंमत

लेटेस्ट POCO F6 फोनच्या 8GB रॅम आणि 256GB वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. त्याबरोबरच, फोनच्या 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. तर, 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Latest Poco F6 5G launched in india

दुसरीकडे, Realme GT 6T च्या 8GB + 128 GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये, 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 32,999 रुपये, 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आणि 12 GB + 512 GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Poco F6 5G Vs Realme GT 6T

डिस्प्ले

POCO F6 फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. या डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आहे. तर, Realme GT 6T मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO 3D कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. प्रोटेक्शनसाठी, यावर Gorilla Glass Victus 2 देखील बसवण्यात आला आहे.

प्रोसेसर

POCO F6 मध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आहे, जो चांगली कामगिरी देतो. फोनमध्ये Iceloop कूलिंग सिस्टम आहे, जी गेमिंग दरम्यान फोनला उष्णतेपासून वाचवेल. Realme GT 6T स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेट आहे. या फोनमध्ये 9 लेझर आय व्हेपर कूलिंग सिस्टम देखील आहे.

POCO F6 5G VS Realme GT 6T

कॅमेरा

POCO F6 च्या मागील बाजूस दोन Sony कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससाठी 8MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे, Realme GT 6T मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 50MP Sony LYT प्राथमिक सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल शूटर आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 32MP Sony IMX615 सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी

POCO F6 या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर, Realme GT 6T मध्ये 120W सुपर Vooc चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 26 मिनिटांत पूर्ण चार्जिंग क्षमता आहे, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo