POCO C71 ची भारतात पहिली सेल आज! बजेट स्मार्टफोनमध्ये मिळेल दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

Updated on 08-Apr-2025
HIGHLIGHTS

POCO C71 स्मार्टफोन भारतीय बाजारात नुकतेच लाँच करण्यात आला आहे.

POCO C71 स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 8 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 32MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.

POCO C71 स्मार्टफोन भारतीय बाजारात नुकतेच लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज हा स्मार्टफोनचा पहिला सेल आज म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी सुरू होणार आहे. पहिल्या सेलमध्ये ऑफर्ससह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असेल. विशेष म्णजे हा कंपनीचा बेजत रेंजमध्ये येणारा लेटेस्ट फोन आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 5200mAh बॅटरी सारख्या अनेक पॉवरफुल फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: HUAWEI Watch Fit 3: एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 10 दिवस चालणारे Smartwatch लाँच, जाणून घ्या किंमत

POCO C71 ची पहिली सेल

POCO C71 स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून खरेदी करता येईल. हा पोको स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये आला आहे.

या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो, जो 6,499 रुपयांना आणण्यात आले आहे. स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून 229 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी करता येईल.

POCO C71 चे फीचर्स आणि स्पेक्स

POCO C71 या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.88 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये Unisoc T7250 Max प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 आधारित OS वर चालतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने अंतर्गत स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 32MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटच्या इतर फीचर्समध्ये 5200mAh बॅटरीचा समावेश आहे. लक्षात घ्या की, ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेन्सरसोबतच फेस अनलॉक फीचर देखील यात उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :