Pixel 7 Series: Google चा फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च, बघा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Pixel 7 Series: Google चा फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च, बघा किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Pixel 7 Series अखेर भारतात लाँच

गुगल पिक्सेल 7 प्रो सह सिनेमॅटिक व्हिडिओ देखील शूट करता येईल.

हे दोन्ही स्मार्टफोन 13 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील.

Google ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 7 सीरीज 6 ऑक्टोबर रोजी लाँच केला आहे. या सिरीजअंतर्गत Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. Google ने Pixel 7 सिरीजसोबत Pixel Watch आणि Pixel Tablet देखील लाँच केले आहे. कंपनीने ही उत्पादने न्यूयॉर्कमधून मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये लाँच केली आहेत. दोन्ही स्मार्टफोन Tensor T2 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. 

हे सुद्धा वाचा : Amazon GIF सेलमध्ये 'या' स्मार्टवॉचवर आकर्षक सूट उपलब्ध, तुमच्या बजेटमध्ये असेल किंमत

Pixel 7 

Pixel 7 ऍल्युमिनियम बॉडी डिझाइनमध्ये लाँच करण्यात आला आहे. पिक्सेल 7 मध्ये Tensor G2 प्रोसेसर Android 13 सह समर्थित आहे. हा फोन 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.32-इंच लांबीचा फुल HD + OLED डिस्प्ले दाखवतो. फोनमध्ये 8 GB RAM सह 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Pixel 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसऱ्या लेन्सला 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल मिळतो. या फोनमध्ये 10.8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील आहे. 

Pixel 7 Pro 

Google Pixel 7 Pro Zirconica-blasted aluminium body design मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा LTPO OLED डिस्प्ले आहे, जो 3,120 x 1,440 pixels रिझोल्यूशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसरसह टायटन M2 प्रोसेसर सुरक्षिततेसाठी समर्थित आहे. Pixel 7 Pro मध्ये  12 GB RAM सह 256 GB स्टोरेज मिळते.

तसेच, यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेरासह 2X झूम उपलब्ध आहे. दुसऱ्या लेन्सला 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 48 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स आहे. 30x सुपर रिझोल्यूशन झूम आणि 5x ऑप्टिकल झूम टेलीफोटो लेन्ससह समर्थित आहेत. फोनमध्ये 10.8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. गुगल पिक्सेल 7 प्रो सह सिनेमॅटिक व्हिडिओ देखील शूट केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. त्याबरोबरच दोन्ही फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्टला सपोर्ट करतो. 

Google Pixel 7 सिरीजची किंमत

Google Pixel 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे आणि Pixel 7 Pro ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Google Pixel 7 स्नो, ऑब्सिडियन आणि लेमनग्रास रंगात सादर करण्यात आला आहे. तर, Pixel 7 Pro Hazel, Obsidian आणि Snow कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन 13 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील. कंपनी विशेष ऑफर म्हणून Pixel 7 वर 6,000 रुपये आणि Pixel 7 Pro वर 8,500 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo