लेटेस्ट Oppo Reno12 आणि Reno12 Pro स्मार्टफोन अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट Oppo Reno12 आणि Reno12 Pro स्मार्टफोन अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
HIGHLIGHTS

Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत.

OPPO Reno 12 सिरीजचे दोन्ही फोन स्टाइलिश लुक आणि उत्कृष्ट फीचर्ससह येतात.

OPPO Reno 12 सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध

Oppo Reno12 Series: आगामी Oppo Reno12 सिरीजची चर्चा मागील काही दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. त्यानंतर अखेर Oppo Reno 12 सिरीज रिलीज झाली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने OPPO Reno12 आणि OPPO Reno12 Pro स्मार्टफोन्स त्यांच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच केले आहेत. दोन्ही फोन स्टाइलिश लुक आणि उत्कृष्ट फीचर्ससह येतात. चला तर मग जाणून घेउयात Oppo Reno12 सिरीजची किंमत आणि फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Poco F6 5G Vs Realme GT 6T: दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमधून कोण आहे तुमच्यासाठी Best?

OPPO Reno12 सिरीजची किंमत

OPPO Reno12 फोन चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 2699 युआन (अंदाजे 31,599 रुपये), 12GB RAM + 512GB स्टोरेजची किंमत 2999 युआन (अंदाजे 35,000 रुपये), 16GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 2999 युआन (अंदाजे 35,000 रुपये) आणि 16GB RAM + 512GB स्टोरेजची किंमत 3199 युआन (अंदाजे 36,699 रुपये) इतकी आहे.

oppo Reno12 Series
Reno 12 Series

दुसरीकडे, OPPO Reno12 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेजची म्हणजेच 3399 युआन (अंदाजे 39,000 रुपये), 12GB रॅम + 512GB स्टोरेजची किंमत 3699 युआन (अंदाजे रुपये 43,199) आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेजची किंमत 3999 युआन (अंदाजे 46,799 रुपये) इतकी आहे.

OPPO Reno12 सिरीजचे स्पेक्स

डिस्प्ले

Oppo Reno12 आणि Reno12 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या FHD+ 1.5K डिस्प्लेवर लाँच करण्यात आले आहेत. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हे फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 सह संरक्षित आहे.

प्रोसेसर

OPPO Reno 12 MediaTek Dimensity 8250 octa-core प्रोसेसरला सपोर्ट करतो, जो 3.1GHz क्लॉक स्पीडवर चालण्यास सक्षम आहे. OPPO Reno 12 Pro मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आहे, जो 3.35GHz क्लॉक स्पीडवर चालतो.

कॅमेरा

OPPO Reno 12 च्या 50MP Sony LYT-600 मुख्य सेन्सर प्रदान केला आहे, जो 50MP Samsung JN5 2x टेलीफोटो लेन्स आणि 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह येतो. OPPO Reno 12 Pro च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 मुख्य सेन्सर, 50MP Samsung JN5 2x टेलिफोटो लेन्स आणि 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. हे दोन्ही फोन 20x डिजिटल झूम आणि OIS ला सपोर्ट करतात.

oppo reno12 and reno12 pro launched
reno12 and reno12 pro launched

त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

बॅटरी

OPPO Reno12 आणि Reno12 Pro स्मार्टफोन पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरीसह येतात. ही बॅटरी जलद चार्ज नव्या स्मार्टफोन्समध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

कलर्स

Oppo Reno 12 5G फोन चीनमध्ये मिलेनियम सिल्व्हर, सॉफ्ट पीच आणि इबोनी ब्लॅक कलर ऑप्शन्ससह येईल. तर, Oppo Reno 12 Pro स्मार्टफोन चीनमध्ये सिल्व्हर फँटसी पर्पल, शॅम्पेन गोल्ड आणि इबोनी ब्लॅक कलर ऑप्शन्ससह येईल. विशेष म्हणजे या दोन्ही स्मार्टफोन्ससोबत कंपनी ब्लूटूथ हेडसेट फ्री देईल, असे सांगितले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo