Finally! मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Oppo K13 5G अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स

Updated on 21-Apr-2025
HIGHLIGHTS

Oppo ने Oppo K13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच केला.

या स्मार्टफोनमध्ये जंबो बॅटरी पॅक आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

Oppo K13 5G स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स मिळतील.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने Oppo K13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनच्या लाँचची चर्चा सुरु होती. आता अखेर Oppo K13 5G फोन सादर केला आहे. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये जंबो बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये इतरही अनेक पॉवरफुल फीचर्स मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Oppo K13 5G ची किंमत आणि स्पेक्स-

Also Read: Smartphones Launch This Week: या आठवड्यात भारतात लाँच Vivo, Realme चे नवे फोन्स, पहा यादी

Oppo K13 5G ची भारतीय किंमत

Oppo चा हा 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो, जो 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन आइस पर्पल आणि प्रिझम ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये आणण्यात आला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 25 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. ही ऑफर HDFC आणि SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास मिळणार आहे.

Oppo K13 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Oppo K13 5G च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची कमाल ब्राइटनेस 1200 nits आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी

Oppo K13 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे. हा फोन 80W सुपरव्हीओसी चार्जिंगला सपोर्ट करतो. ही बॅटरी 30 मिनिटांत फोन 62% पर्यंत चार्ज होते, असे सांगण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी फोनला IP65 रेटिंग देण्यात आले आहे. कंपनी फोनसोबत चार्जर देखील मिळेल.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Oppo K13 5G फोनच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य AI कॅमेरा आणि 2MP चा दुसरा सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हँडसेटमध्ये 16MP कॅमेरा आहे. त्यात स्क्रीन ट्रान्सलेटर, AI रायटर, AI समरी, AI क्लॅरिटी एन्हांसर, AI अनब्लर, AI रिफ्लेक्शन रिमूव्हर आणि AI इरेजर सारखे अनेक AI फीचर्स देखील दिले आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :