Oppo Find N2 Flip ची भारतात सेल सुरु, मिळतोय तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट

Oppo Find N2 Flip ची भारतात सेल सुरु, मिळतोय तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट
HIGHLIGHTS

Oppo Find N2 Flip फोनची विक्री सुरु

डिव्हाइस फ्लिपकार्ट आणि ओप्पो ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल.

बघा नव्या स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

Oppo Find N2 Flip Foldable Smartphone या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, आज Flipkart आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर ग्राहकांसाठी या Oppo मोबाईल फोनची विक्री सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊयात किंमत आणि ऑफर्स. 

हे सुद्धा वाचा : Vodafone Idea : कंपनीने लाँच केले दोन स्वस्त प्लॅन्स, किती आहे किंमत आणि काय मिळेल खास ?

Oppo Find N2 Flip Price in India: 

या Oppo Foldable Phone च्या 8 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. तुम्ही हे डिव्हाइस फ्लिपकार्ट आणि ओप्पो ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. हा फोन मूनलाईट पर्पल आणि एस्ट्रल ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.

फोनसोबत ICICI, HDFC, येस बँक, SBI, अमेरिकन एक्सप्रेस आणि कोटक बँक कार्डवर फ्लॅट 5 हजारांची सूट दिली जात आहे. दरम्यान, ज्या ओप्पो ग्राहकांना त्यांचे जुने फोन एक्सचेंज करायचे आहेत त्यांना 5,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनस मिळेल. म्हणजेच बँक कार्ड आणि एक्सचेंजचा फायदा मिळून हा फोन तुम्हाला 10 हजार रुपयांनी स्वस्त पडेल.

Oppo Find N2 Flip स्पेसिफिकेशन्स:

 फोनमध्ये 120 Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे. तसेच, 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 60 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या नवीनतम Oppo फोनमध्ये, MediaTek Dimensity 9000+ octa-core प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Arm Mali-G710 MC10 GPU देण्यात आला आहे.

फोनच्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX890 कॅमेरा सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनला उर्जा देण्यासाठी 44W फास्ट चार्ज सपोर्टसह 4300 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo