भारीच की ! Oppo A78 वर सर्वात मोठी सूट, अप्रतिम ऑफरसह खरेदी करा फोन…

Updated on 19-Jan-2023
HIGHLIGHTS

Oppo A78 5G वर मिळतेय मोठी सवलत

SBI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 1300 रुपयांपर्यंतची वेगळी सूट

Amazon वर ही जबरदस्त ऑफर सुरु आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अलीकडेच लाँच झालेला Oppo A78 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. यासोबतच, हा फोन त्याच्या स्पेसिफिकेशनमुळेही खूप चर्चेत आहे. खास गोष्ट म्हणजे Oppo ने हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये लेटेस्ट फीचर्स मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy S23 सिरीजची किंमत लाँचपूर्वी लीक, 200MP कॅमेरासह मिळतील मजबूत फीचर्स

तुम्ही Amazon वरून Oppo A78 5G सहज खरेदी करू शकता. या फोनची MRP 21,999 रुपये आहे आणि तुम्ही 14% डिस्काउंटनंतर फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही आज ऑर्डर केल्यास, ते 1-2 दिवसात वितरित केले जाईल. यावर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील मिळतात. SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 1300 रुपयांपर्यंतची वेगळी सूट मिळू शकते. यासोबत नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील दिला जात आहे.

आता त्या ऑफरबद्दल बोलूया ज्या अंतर्गत तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळू शकते. जुना स्मार्टफोन Amazon वर एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 18,049 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. पण एवढी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती व्यवस्थित असायला हवी. तुम्हाला फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. 

स्पेसीफिकेशन्स :

फोनमध्ये 6.56 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट उपलब्ध आहे. यामध्ये ड्युअल अल्ट्रा लाइनर स्पीकर्स देखील देण्यात आले आहेत. Oppo A78 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्याय देते. क्रिस्टल क्लियर AI कॅमेरा सेटअप यामध्ये देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. यासोबतच यात 8MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :