कमी किंमतीत जबरदस्त फीचर्ससह Oppo A78 5G भारतात लाँच, वाचा डिटेल्स

कमी किंमतीत जबरदस्त फीचर्ससह Oppo A78 5G भारतात लाँच, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Oppo A78 5G नवीन स्मार्टफोन लाँच

या फोनची किंमत एकूण 18,999 रुपये निश्चित केली आहे.

18 जानेवारी 2023 पासून ग्राहकांसाठी या हँडसेटची विक्री सुरू होईल.

हँडसेट निर्माता Oppo ने भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी त्यांच्या A सीरीज अंतर्गत एक नवीन 5G स्मार्टफोन Oppo A78 5G लाँच केला आहे. या नवीनतम 5G मोबाइल फोनमध्ये MediaTek Dimensity प्रोसेसरसह 50-megapixel प्राइमरी कॅमेरा सेन्सर सारखी फीचर्स आहेत. बघुयात नवीन स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…  

हे सुद्धा वाचा : Amazon Republic Day Sale 2023: TV वर मिळतेय भारी सूट, बघा ऑफर्स

Oppo A78 5G 

या Oppo फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो 480 nits पीक ब्राइटनेस आणि HD Plus (1612×720 pixels) रिझोल्यूशन ऑफर करतो. MediaTek Dimensity 700 5G चिपसेट Oppo A78 5G स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये 8 GB RAM सह 128 GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा फोन 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो, म्हणजेच या फोनद्वारे ग्राहक 16 GB पर्यंत रॅमचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय फोनमधील मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल. 

फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते. स्मार्टफोन नवीनतम Android 13 वर कार्य करतो. याशिवाय सुरक्षेसाठी या डिवाइसमध्ये साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त, या लेटेस्ट फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. मात्र, कंपनीने या नवीनतम Oppo मोबाईल फोनमध्ये अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर दिलेला नाही. फोनच्या फ्रंटवर वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉचमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

किंमत : 

या Oppo मोबाईल फोनचा फक्त एक व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, जो 8 GB RAM सह 128 GB अंतर्गत स्टोरेज ऑफर करतो. कंपनीने या मॉडेलची किंमत 18,999 रुपये निश्चित केली आहे. 18 जानेवारी 2023 पासून ग्राहकांसाठी या हँडसेटची विक्री सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, हा हँडसेट ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo