अरे बापरे! OnePlus फोन्सची मोबाईल शॉप आणि रिटेल स्टोअर्सवर विक्री होणार बंद? 1 मे पासून होईल परिणाम। Tech News

Updated on 12-Apr-2024
HIGHLIGHTS

Oneplus चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.

1 मे पासून वनप्लस फोनची विक्री बंद करण्यात येणार असे वृत्त आले आहे.

देशातील सुमारे 4500 स्टोअर्स साऊथ इंडियन ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशन (ORA) च्या नेतृत्वाखाली येतात.

टेक विश्वातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. Oneplus चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. एवढेच नाही, कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कमी किमतीत प्रीमियम फोनचे फीचर्स ऑफर करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. होय, जेव्हा सर्वोत्कृष्ट Android स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा बरेच लोक OnePlus वर विश्वास ठेवतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, मध्यम बजेट फोन खरेदी करणारे बहुतेक वापरकर्ते हा ब्रँड निवडण्यास प्राधान्य देतात. पण या मोबाईल ब्रँडला आता भारताच्या ऑफलाइन मार्केटमध्ये मोठा फटका बसू शकतो. OnePlus मोबाईल फोन 1 मे 2024 पासून किरकोळ स्टोअर्स आणि मोबाईल शॉप्समध्ये विकले जाणे बंद होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

OnePlus स्मार्टफोनची विक्री होणार बंद?

OnePlus मोबाईल फोन आणि टॅब्लेटची विक्री येत्या काही दिवसांत किरकोळ दुकानांवर बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण भारतीय संघटित रिटेलर्स असोसिएशन (ORA) कडून एक विधान आले आहे की, ”ते या संघटनेच्या अंतर्गत किरकोळ विक्रेत्यांमध्ये OnePlus डिव्हाइसची विक्री थांबवणार आहेत. त्याबरोबरच, दक्षिण भारतीय ORA ने OnePlus इंडियाचे सेल्स डायरेक्टर रणजीत सिंग यांना पत्र लिहून 1 मे पासून वनप्लस फोनची विक्री बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कारण

ताज्या वृत्तानुसार, ORA ने OnePlus India च्या रणजीत सिंह यांना पत्र लिहिताना अशा अनेक समस्या मांडल्या आहेत, ज्याचा सामना ऑफलाइन मार्केटमध्ये काम करणारे रिटेलर्स आणि मोबाईल शॉप चालवणारे लोक करत आहेत. समस्या पुढीलप्रमाणे?

  • असोसिएशनच्या मते, कंपनीने दिलेल्या कमी नफ्याच्या मार्जिनमुळे दुकानदारांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. त्यांना वनप्लस उत्पादनांवर फारच कमी नफा होतो, जो व्यवसायाच्या हिताचा नाही, असे त्यांचे मत आहे.
  • OnePlus धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ORA ने म्हटले आहे की, कंपनी वॉरंटी दावे आणि सेवांना विलंब करते. त्यामळे दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना ग्राहकांच्या असंतोषाचा सामना देखील करावा लागतो.
  • याव्यतिरिक्त, OnePlus ने लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये केलेल्या दुर्लक्षावरही असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्या ठिकाणी विकले जाणार नाहीत OnePlus फोन?

देशातील सुमारे 4500 स्टोअर्स साऊथ इंडियन ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशन (ORA) च्या नेतृत्वाखाली येतात. यामध्ये पूर्विका मोबाईल, संगीता मोबाईल, बिग सी आणि पूजा सारख्या मोठ्या रिटेल चेनचाही समावेश आहे. OnePlus फोनची विक्री 1 मे पासून या ब्रँडच्या स्टोअरमध्ये बंद होऊ शकते.

ORA द्वारे लागू करण्यात आलेल्या OnePlus सेल बंदीचा सर्वाधिक परिणाम देशाच्या दक्षिणेकडील राज्यांवर होणार आहे. असोसिएशनचे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चांगले अस्तित्व आहे. या राज्यांमध्ये वनप्लस कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. मात्र लक्षात घ्या की, दक्षिण भारतीय ORA ने उचललेल्या पावलांवर OnePlus कडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :