OnePlus Red Rush Days Sale
OnePlus Red Rush Days Sale: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ने नवीन ‘Red Rush Days Sale’ ची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सेल 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 16 फेब्रुवारीपर्यंत चालेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही सेल अधिकृत OnePlus India वेबसाइटवर लाईव्ह असेल. या सेल दरम्यान कंपनी OnePlus 13, OnePlus 12, OnePlus Nord 4 आणि इतर स्मार्टफोनवर मोठी सूट देण्याचे आश्वासन देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात पाहुयात सेलदरम्यान OnePlus स्मार्टफोन्सवर मिळणारे डील्स-
या सेलदरम्यान OnePlus 13 वर तब्बल 5,000 रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल. तसेच, OnePlus 13R वर खरेदीदारांना 3,000 रुपयांची सूट मिळेल. लक्षात घ्या की, या ऑफर निवडक बँक कार्डवर लागू असतील, तुमच्या माहितीसाठी सांगतो, OnePlus 13 अलिडकेच जानेवारी महिन्यात सुरुवातीला भारतात 69,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. यासह, कंपनीने या सिरीजअंतर्गत येणारा स्वस्त स्मार्टफोन OnePlus 13R देखील लाँच केला आहे.
प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध Oneplus ने मागील वर्षी OnePlus 12 फोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन मॉडेल थोडा जुना असेल तरीही आपल्या अप्रतिम फीचर्ससह हा अजूनही आकर्षक स्मार्टफोन आहे. OnPlus 12 सध्या OnePlus.in वर 61,999 रुपयांना विकला जात आहे. तर, OnePlus Red Rush सेल दरम्यान किंमत 60,000 रुपयांच्या खाली येईल. कारण, सेलदरम्यान या स्मार्टफोनवर देखील निवडक बँक कार्डवर 3,000 रुपयांची फ्लॅट सूट आणि 4,000 रुपयांपर्यंतची इन्स्टंट बँक सूट मिळणार आहे.
मध्यम श्रेणीच्या फोनसाठी म्हणजेच लेटेस्ट OnePlus Nord 4 वर 1,000 रुपयांपर्यंतच्या फ्लॅट डिस्काउंटसह मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बँक कार्डवर 4,000 रुपयांपर्यंतची इन्स्टंट बँक डिस्काउंट ऑफर मिळणार आहे.
एवढेच नाही तर, OnePlus Nord CE 4 वर 1000 रुपयांपर्यंतची फ्लॅट डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला OnePlus Nord CE 4 आणि OnePlus Nord CE 4 Lite वर 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट ऑफर मिळतील. या सेलदरम्यान केवळ स्मार्टफोनच नाही तर, Oneplus च्या इतर उपकरणांवर देखील मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. OnePlus च्या टॅब्लेट्स, इयरबड्स इ. उपकरणांवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. अधिक माहितीसाठी OnePlus India च्या अधिकृत साईटला भेट द्या.