OnePlus चा सर्वात स्वस्त फोन अखेर लाँच, 16 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

OnePlus चा सर्वात स्वस्त फोन अखेर लाँच, 16 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

OnePlus Nord 20 SE स्मार्टफोन लाँच

कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी OnePlus चा सर्वात स्वस्त फोन

नवीन स्मार्टफोनची किंमत अंदाजे 15,800 रुपये

OnePlus चा स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन आहे, पण बजेट कमी आहे. आता बजेटची चिंता करण्याची गरज नाही. कारण कंपनीने आपल्या कमी बजेटच्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord 20 SE लाँच केला आहे. जो OnePlus ने AliExpress वर खरेदीसाठी सूचीबद्ध केला आहे. डिव्हाइसमध्ये समोर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि मागील बाजूस 50-मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. 

याव्यतिरिक्त, स्मार्टफोन MediaTek च्या Helio चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि 5000mAh फास्ट-चार्जिंग बॅटरी पॅक करतो. OnePlus Nord 20 SE च्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती बघा…

हे सुद्धा वाचा : खरंच ! रिलायन्स JIO कंपनीची 5G सेवा 15 ऑगस्ट रोजी सुरू होणार ? वाचा सविस्तर

OnePlus Nord 20 SE

OnePlus Nord 20 SE मध्ये 720×1612 पिक्सेल आणि 600 nits ब्राइटनेसच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीची IPS LCD स्क्रीन आहे. डिस्प्ले नॉचमध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे आणि त्याच्या मागील पॅनलमध्ये 50-मेगापिक्सेल मेन + 2-मेगापिक्सेल डेप्थ ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे.

फोन Helio G35 चिपने सुसज्ज आहे. डिव्हाइस 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. यात मायक्रो SD कार्ड स्लॉट आहे. फोन Android 12 OS आणि OxygenOS 12.1 वर चालतो. यामध्ये, 5000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. प्रोटेक्शनसाठी, यामध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक सारखे फीचर्स आहेत.

Nord 20 SE च्या इतर फीचर्समध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, 4G VoLTE, WiFi, Bluetooth 5.0, GPS, एक USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे. Nord 20 SE हे दुसरे तिसरे कोणी नसून OPPO A77 4G ची रीब्रँडेड वर्जन आहे, असे म्हटले जात आहे. ज्याची किंमत भारतात 15,499 रुपये आहे.

OnePlus Nord 20 SE ची किंमत

OnePlus Nord 20 SE AliExpress सूचीनुसार, 12 ऑगस्ट रोजी विक्रीसाठी जाईल. याची किंमत $199 म्हणजेच  अंदाजे 15,800 रुपये आहे. ज्यामुळे हा ब्रँडचा सर्वात परवडणारा फोन आहे. हा स्मार्टफोन सेलेस्टियल ब्लॅक आणि ब्लू ओएसिस कलर ऑप्शनमध्ये येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo