Price Cut! तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त झाला OnePlus 11R, बघा Powerful फीचर्ससह येणाऱ्या फोनची नवी किंमत। Tech News

HIGHLIGHTS

लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11R च्या किमतीत घट करण्यात आली आहे.

स्मार्टफोनच्या 8GB वेरिएंटची किंमत 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली.

6GB व्हेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे.

OnePlus ने अलीकडेच आपले लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात लाँच केले. कंपनीचे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. दरम्यान, कंपनीने गेल्या वर्षीच्या फ्लॅगशिप किलर फोन OnePlus 11R च्या किमतीत गुपचूपपणे कपात केली आहे. ई-कॉमर्स साइट्सव्यतिरिक्त, फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर कमी किंमतीसह सूचीबद्ध आहे. जाणून घ्या OnePlus 11R ची नवीन किंमत-

OnePlus 11R ची नवी किंमत

OnePlus ने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये OnePlus 11R स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 16GB + 256GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता. ज्यांची किंमत अनुक्रमे 39,999 आणि 44,999 रुपये होती. ग्राहक गॅलेक्टिक सिल्व्हर आणि सोनिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये OnePlus 11R खरेदी करू शकतात.

oneplus 11r price cut 50mp camera amoled display premium phone is now 3000 rs less

मात्र, आता कंपनीने स्मार्टफोनच्या 8GB वेरिएंटची किंमत 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा फोन 37,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर दुसरीकडे, 16GB व्हेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे, जो आता 41,999 रुपयांना मिळेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी ICICI बँक क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांची झटपट सूटही देत ​​आहे.

OnePlus 11R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11R मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. OnePlus 11R मध्ये डिव्हाइसच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये Sony IMX 890 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतील. तर, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :