Nothing Phone (3a)
आकर्षक स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध असेलेली स्मार्टफोन निर्माता Nothing आगामी फोन्स भारतात लाँच करण्यास सज्ज झाली आहे. फोनबद्दल बरीच माहिती उघड झाली आहे. दरम्यान, Nothing Phone (3a) सिरीजमध्ये आता व्हॅनिला 3a सोबत एक नवीन प्रो मॉडेल देखील समाविष्ट आहे. ही सिरीज मार्चच्या सुरुवातीला भारतात लाँच केला जाईल. लाँचिंगपूर्वी, सिरीजमधील स्मार्टफोनचा अधिकृत लूक समोर आला आहे, ज्यामध्ये फोनची डिझाईन देखील पाहता येईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या नवीन सिरीजमध्ये पूर्वीप्रमाणेच glyph LED लाईट सिस्टम दिसते. मात्र, यावेळी फोनचा कॅमेरा मॉड्यूल वेगळा आहे. यावेळी कॅमेरा सेन्सर्स फोनच्या मागील बाजूस असलेल्या गोलाकार कॅमेरा रिंगमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच, सेन्सर्सची अलाइनमेंट देखील पूर्वीपेक्षा वेगळी आहे. जाणून घ्या सविस्तर-
नथिंगने आपल्या अधिकृत X हॅन्डलवर पोस्ट शेअर करत आगामी फोनची तारीख जाहीर केली आहे. होय, कंपनी येत्या 4 मार्च रोजी बाजारात नथिंग फोन (3a) लाँच करणार आहे. हा लाँच कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तुम्हाला फोनची डिझाईन आणि सर्व लूक्स वरील पोस्टमध्ये पाहायला मिळतील.
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर नथिंग फोन (3a) स्मार्टफोनचा अधिकृत लूक समोर आला आहे. फोनमध्ये कंपनीचा सिग्नेचर ट्रान्सपरंट लूक दिसेल, त्यासोबतच फोनमध्ये ग्लिफ एलईडी लाईट सिस्टम असेल. मात्र, यावेळी कंपनीने फोनची डिझाईन वेगळी ठेवली आहे. फोनमध्ये एक मोठा गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेन्सर दिसतील. या मॉड्यूलमध्ये कॅमेरा सेन्सर्ससोबत एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. हा फोन काळा आणि राखाडी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
फोनच्या लीक झालेल्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 6.77 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7एस जनरल 3 प्रोसेसर असू शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यासोबतच, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर उपलब्ध असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. यावेळी कंपनीने फोनमध्ये मुख्य कॅमेऱ्यासोबत एक मोठा पेरिस्कोप सेन्सर देखील दिला आहे, जो मुख्य कॅमेऱ्यासोबतच आहे. याशिवाय, युनोमध्ये अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. मात्र, आगामी फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँच झाल्यानतंरच पुढे येतील.