Nothing Phone 3a series sale starts Today check first sale day offers price specification
ट्रान्सपरंट लुक देण्यासाठी प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन निर्माता Nothing आपले नवे आणि बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. होय, अनेक दिवसांपासून Nothing च्या Nothing Phone 3a आणि 3a Pro स्मार्टफोन्सची चर्चा सुरु होती. बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०२५ मध्ये, नथिंगने नुकतेच त्यांच्या नवीन फोन 3a लाइनअपचे अनावरण केले. अखेर Nothing Phone 3a आणि 3a Pro फोन्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत.
या दोन्ही स्मार्टफोन्सचे विशेष फिचर म्हणजे त्यांचा ग्लिफ इंटरफेस विविध कस्टमायझेशन ऑप्शन्ससह येतो. यावेळी या दोन्ही फोन्समध्ये एक लक्षणीय नवी गोष्ट म्हणजे ‘एसेन्शियल की’ होय. यासह अहवालानुसार, एका टॅपने स्क्रीनशॉट घेतला जाईल, तर दीर्घकाळ दाबून ठेवल्याने व्हॉइस नोट रेकॉर्डिंग सुरू होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Nothing Phone 3a आणि 3a Pro ची किंमत आणि फीचर्स-
Also Read: आगामी लाँचच्या तोंडावरच Nothing Phone 2a वर धमाकेदार ऑफर! किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी
आम्ही तुम्हाला सांगतो की, नवे स्मार्टफोन्स कंपनीने मिड-रेंजमध्ये सादर केले आहेत. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone 3a ची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तर, दुसरीकडे Nothing Phone 3a Pro फोन 29,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. वृत्तांनुसार हे दोन्ही फोन्स नुकतेच भारतीय बाजरात लाँच झालेल्या OnePlus 13R आणि Vivo V50 फोनला थेट स्पर्धा देत आहेत.
Nothing Phone 3a स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. तर, दुसरीकडे प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेशसह 6.77-इंच लांबीचा AMOLED पॅनेल देखील देण्यात आला आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 चिपसेटसह कार्य करतात. यासह फोन चालवताना तुम्हाला एकदम स्मूथ अनुभव येणार आहे.
फोटोग्राफीसाठी Phone 3a मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि 50MP चा नवीन टेलिफोटो सेन्सरसह अपग्रेडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोर 32MP चा सेल्फी शूटर देखील देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे प्रो मॉडेलमध्ये 50MP चा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स, 50MP चा मुख्य लेन्स आणि 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे.
Nothing Phone 3a पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W चार्जिंग सपोर्टसह येईल. तर, दुसरीकडे प्रो मॉडेलमध्ये सुद्धा 5000mAh बॅटरी देखील आहे, जी 50W चार्जिंग सपोर्टसह येईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या स्मार्टफोनची मिळालेल्या माहितीनुसार अलिडकेच लाँच झालेल्या OnePlus आणि Vivo फोन्सशी होतेय.
लेटेस्ट OnePlus 13R या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात लाँच झाला. फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोन 6.78 इंच लांबीच्या LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा 120Hz हाय रिफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 8MP मॅक्रो कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच भारतात त्यांची मिड रेंज स्मार्टफोन सिरीज Vivo V50 लाँच केली आहे. हे Vivo V40 चे अपग्रेडेड मॉडेल आहे आणि त्यात AI फीचर्ससह अनेक आवश्यक फीचर्स आहेत. यात 6.7 इंच लांबीचा क्वाड कर्व्ड फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे.
अखेर Nothing Phone 3a आणि 3a Pro फोन्स भारतीय बाजारात लाँच