सध्या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing आगामी स्मार्टफोन लाइनअप, Nothing Phone 3a सीरीज लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या नवीन लाइनअपमध्ये Nothing Phone 3a आणि Nothing Phone 3a Pro असे दोन स्मार्टफोन्स मॉडेल्स लाँच केले जातील. पण जर तुम्ही नथिंग फोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण, आगामी फोनच्या लाँच होण्यापूर्वीच Amazon वर Nothing Phone 2a वर धमाका ऑफर मिळत आहे.
Also Read: Upcoming Smartphones in March 2025: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार धमाल स्मार्टफोन्स!
भारतात Nothing Phone 2a ची किंमत 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. सध्या Amazon वर हा फोन 19,498 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. आणखी बचत करण्यासाठी तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता.
नवीनतम सवलतीसह Nothing Phone 2a फोन 19,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. ज्यामुळे जास्त खर्च न करता अपग्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगली डील आहे. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Amazon ला भेट द्या.
Nothing Phone 2a च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 120hz रिफ्रेश रेटसह FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले HDR10+ ला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेट आहे. हा प्रोसेसर 12 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी नथिंग फोन २ए मध्ये 50MP प्रायमरी शूटर आणि 50MP चा अल्ट्रावाइड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा सर्वोत्तम मानला जातो. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आणली आहे. तसेच, या डिव्हाइसला IP54 प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.