Nothing Phone 1: आज होणार फोनची पहिली विक्री, खरेदी करण्यापूर्वी ‘या’ समस्या देखील जाणून घ्या

Nothing Phone 1: आज होणार फोनची पहिली विक्री, खरेदी करण्यापूर्वी ‘या’ समस्या देखील जाणून घ्या
HIGHLIGHTS

Nothing Phone 1 ची आज पहिली विक्री

फोन आज Flipkart वरून संध्याकाळी 7 वाजता विक्रीसाठी उपलब्ध

खरेदी करण्यापूर्वी यात आलेल्या समस्या जाणून घ्या

Nothing Phone 1 ची भारतात पहिली विक्री आज म्हणजेच 21 जुलै रोजी आहे. नथिंग फोन 1 ची विक्री आजपासून सुरू होत आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील माहित असणे आवश्यक आहे. Nothing Phone 1 हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. Nothing ची सुरुवात 2022 मध्ये OnePlus चे सह-संस्थापक Carl Pei यांनी केली आहे. नथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंच लांबीचा OLED डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह आहे. नथिंग फोन 1 चे सर्वात मोठे फिचर म्हणजे त्यात दिलेला Glyph लाईट होय. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि फीचर्स…

हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! Google Pixel Buds Pro लाँच, यासह Google Pixel 6a स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर देखील सुरू

 Nothing Phone ची किंमत 

Nothing Phone 1 ची किंमत 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजसाठी 32,999 रुपये, 8 GB रॅम सह 256 GB स्टोरेजसाठी 35,999 रुपये आणि 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेजसाठी 38,999 रुपये आहे. फोन आज Flipkart वरून संध्याकाळी 7 वाजता ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये विक्रीसाठी जाईल. पहिल्या सेलमध्ये प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळेल. तसेच, HDFC बँकेच्या कार्डसह 2,000 सूट मिळेल. 
नथिंग फोन 1 चे स्पेसिफिकेशन्स

Android 12 नथिंग फोन 1 सह मिळेल. याशिवाय, फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबचा फुल HD + OLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. डिस्प्लेसह HDR10+ साठी समर्थन आहे आणि ब्राइटनेस 1200 nits आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर असून 12 GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

nothing phone 1

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आहेत, त्यामध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX766 सेन्सर आहे. दुसरा लेन्स देखील 50-मेगापिक्सेलचा सॅमसंग JN1 सेन्सर आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल आहे. यासह, EIS स्टॅबिलायझेशन मिळेल. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा Sony IMX471 कॅमेरा देण्यात आला आहे. पॅनोरमा नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, एक्सपर्ट मोड कॅमेरासोबत उपलब्ध असेल.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Wi-Fi 6 Direct, Bluetooth v5.2, NFC, GPS/ A-GPS, GLONASS, GALILEO, QZSS आणि Type-C पोर्ट आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. 

नथिंग फोन 1 मध्ये आतापर्यंत आलेल्या समस्या

Nothing चा पहिला फोन लाँच झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. युजर्सच्या तक्रारीनुसार, नथिंग फोन 1 च्या स्क्रीनवर ग्रीन टींट लाईन दिसत आहे. अनेक युजर्सनी ट्विटरवर त्याची छोटी व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. कंपनीने अनेक यूजर्सला फोन रिप्लेस करण्यासाठी पाठवले आहे, पण रिप्लेसमेंट फोनमध्येही अशाच समस्या पाहायला मिळत आहेत. त्यांना मिळालेल्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याजवळील स्क्रीन दिसत नसल्याची तक्रारही युजर्सनी केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी असाही दावा केला आहे की, वॉटर रेझिस्टंटसाठी IP53 रेटिंग असूनही फोनच्या कॅमेऱ्यात मॉइश्चर आला आहे.

कंपनीने अपडेट जारी केले

नथिंग फोन 1 साठी पहिले OTA अपडेट बुधवार, 20 जुलै रोजी प्रसिद्ध झाले. हे अपडेट भारतात तसेच इतरत्र जारी करण्यात आले आहे. हे अपडेट सुमारे 94 MB आहे. कंपनीने दावा केला आहे की, या अपडेटनंतर नथिंग फोन 1 चा युजर एक्सपेरियन्स सुधारला जाईल. त्याबरोबरच, ऑपरेटिंग सिस्टममध्ये साउंड इफेक्ट्समध्येही सुधारणा दिसून येईल. नवीन अपडेट या फोनच्या LED लाईट इंटरफेसमध्ये आणखी सुधारणा करतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo