जबरदस्त ! Google Pixel Buds Pro लाँच, यासह Google Pixel 6a स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर देखील सुरू

जबरदस्त ! Google Pixel Buds Pro लाँच, यासह Google Pixel 6a स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर देखील सुरू
HIGHLIGHTS

Google Pixel Buds Pro लाँच

यासह, Google Pixel 6a स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर देखील सुरू

28 जुलैपासून फ्लिपकार्टवर हे उपकरण खरेदीसाठी उपलब्ध असेल

Google ने भारतात Pixel Buds Pro लाँच केला आहे. Google ने या बडसह Google Pixel 6a स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर देखील सुरू केले आहे. Google Pixel Buds Pro(ANC) आणि सहा-कोर ऑडिओ चिपसह येतो. ही चिप गुगलच्या स्वतःच्या अल्गोरिदमवर काम करते. या बड्समध्ये एक डेडिकेटेड ट्रान्सपरन्सी मोड मिळतो, जो उत्तम साउंड आउटपुट देतो. चला जाणून घेऊया Google Pixel Buds Pro चे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन 1 वर्ष मोफत, त्याबरोबरच डेटा आणि मोफत कॉल्सचा आनंद घ्या

Google Pixel Buds Pro चे स्पेसिफिकेशन्स 

बड्स ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन (ANC) आणि स्ट व्हॉइस कॉलिटीसह लाँच करण्यात आल्या आहेत. Google Pixel Buds Pro मध्ये Google ने विकसित केलेली सहा-कोर ऑडिओ चिप मिळेल, जी उत्तम आवाजासाठी डिझाइन केलेली आहे. Google Pixel Buds Pro हे Google ने Pixel Buds आणि Pixel Buds A-सिरीजचे सक्सेसर म्हणून सादर केले आहेत. या बड्समध्ये हँड्स फ्री गुगल असिस्टंट फीचर देखील देण्यात आले आहे.  वॉटर रेसिस्टन्ससाठी बड्समध्ये IPX4 आणि केस मध्ये IPX2 रेटिंग मिळते.

pixel buds pro

Google Pixel Buds Pro ANC शिवाय 31 तासांचा प्लेबॅक वेळ देतात. केस USB C-Type द्वारे चार्ज करता येतील. या बड्समध्ये Qi वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे. गुगलचा दावा आहे की, केस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, हे बड्स मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटीसह येतात, जे एका वेळी अनेक उपकरणांशी कनेक्ट होऊ शकतात. या बड्समध्ये ब्लूटूथ v5.0 समर्थित आहे. अँड्रॉइड आणि iOS सह टॅबलेट  आणि लॅपटॉपशी देखील बड कनेक्ट केले जाऊ शकतात.

Google Pixel Buds Pro किंमत

हे इयरबड्स चारकोल, कोरल, फॉग आणि लेमनग्रास या चार कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहेत. Google Pixel Buds Pro 19,990 रुपयांना सादर करण्यात आले आहेत. 28 जुलैपासून फ्लिपकार्टवरून हे उपकरण खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo