Nothing आणतोय आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन! लाँचपूर्वीच किंमत लीक, CMF Phone 1 तुमच्या बजेटमध्ये आहे का? 

Nothing आणतोय आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन! लाँचपूर्वीच किंमत लीक, CMF Phone 1 तुमच्या बजेटमध्ये आहे का? 
HIGHLIGHTS

Nothing ने अलीकडेच आपल्या नव्या CMF Phone 1 लाँचची घोषणा केली.

लेटेस्ट CMF Phone 1 ची किंमत लाँचपूर्वी लीक करण्यात आली आहे.

CMF Phone 1 किंमत कंपनीच्या आतापर्यंतच्या फोनच्या किमतीपेक्षा खूप कमी असेल.

Nothing च्या सब-ब्रँड CMF ने अलीकडेच त्याचा पहिला फोन CMF Phone 1 ची घोषणा केली. या डिवाइसबद्दल अद्याप जास्त माहिती पुढे आलेली नाही, परंतु सोशल मीडियाद्वारे अनेक लीक्स पुढे आलेले आहेत. अलीकडेच आलेल्या एका ताज्या लीकनुसार, लेटेस्ट CMF Phone 1 ची किंमत लाँचपूर्वी लीक करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Nothing च्या स्मार्टफोन लाईनअपमध्ये एक स्वस्त फोन असेल.

Also Read: Realme C65 5G नव्या आणि आकर्षक रंगात लाँच! किंमत फक्त 10,499 रुपये, बघा संपूर्ण तपशील

CMF Phone 1 ची किंमत लीक

आता 91Mobiles च्या नवीन अहवालात टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने समोर आले आहे. नवा अहवाल CMF Phone 1 च्या किमतीवर प्रकाश टाकते. रिपोर्टनुसार, हा फोन 6GB/128GB वेरिएंटसाठी 19,999 रुपयांच्या बॉक्स किंमतीसह येऊ शकतो.

या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, बॉक्सवर अससेल्या MRP पेक्षा कमी किमतीत फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ब्रारच्या मते CMF Phone 1 ची किंमत सुमारे 18,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. यासह तुम्हाला डिस्काउंट ऑफर देखील मिळेल, त्यासह किंमत 17,000 रुपये होईल.

CMF Phone 1

nothings CMF-Phone-1-design

CMF फोन 1 स्मार्टफोन थोडा कमी पॉवरफुल प्रोसेसर असलेला Nothing Phone 2a ची पुनर्निर्मित वर्जन असू शकतो. या तुलनेत Nothing Phone 2a ची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते. ज्यामुळे CMF Phone 1 अधिक परवडणारा पर्याय असणार आहे. CMF च्या डेब्यू स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. एवढेच नाही तर, फोनच्या स्पेक्सबद्दल देखील जास्त माहिती पुढे आलेली नाही. कंपनीच्या अधिकृत लाँच घोषणेमध्ये एक टीझर आहे, ज्यात लेदर फिनिशसह फोनची मागील डिझाईन दिसत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo