Realme C65 5G नव्या आणि आकर्षक रंगात लाँच! किंमत फक्त 10,499 रुपये, बघा संपूर्ण तपशील

Realme C65 5G नव्या आणि आकर्षक रंगात लाँच! किंमत फक्त 10,499 रुपये, बघा संपूर्ण तपशील
HIGHLIGHTS

Realme C65 5G फोन स्पीडी रेड कलर ऑप्शनसह भारतात लाँच

Realme C65 5G फोन स्पीडी रेड कलरची किंमत 10,499 रुपयांपासून सुरु

Realme C65 5G स्पीडी रेड एडिशन Flipkart वर 14 जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार

Realme ने अलीकडेच म्हणजे एप्रिलमध्ये आपला नवीनतम Realme C65 5G मोबाईल फोन लाँच केला होता. त्यानंतर, आता Realme C65 5G फोन स्पीडी रेड कलर ऑप्शनसह सादर केला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बजेटमध्ये हा एक उत्तम 5G पर्याय आहे. फोनच्या बेस मॉडेलची किंमत फक्त 10,499 रुपयांपासून सुरू होते. चला तर मग जाणून घेऊयात Realme C65 5G च्या नव्या फोनची किंमत-

Also Read: आपटल्यावरही फुटणार नाही! Honor च्या मजबूत फोनवर 4000 रुपयांचा Discount, बघा Best ऑफर

Realme C65 5G ची किंमत आणि ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, नवीन Realme C65 5G स्पीडी रेड कलरच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10499 रुपये आहे, मिड मॉडेल 4GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 11,499 रुपये आणि टॉप मॉडेल 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 1,000 रुपयांच्या झटपट सूटसह भारतात उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme C65 5G स्पीडी रेड एडिशन Flipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवर 14 जूनपासून दुपारी 12 वाजता उपलब्ध होईल.

Realme C65 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme C65 5G च्या स्पीडी रेड कलर ऑप्शनमध्ये 6.67-इंच लांबीचा HD डिस्प्ले देखील आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसर आहे. फोनमध्ये आर्म माली G57 MC2 GPU ग्राफिक्ससाठी उपस्थित आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये, 6GB पर्यंत रॅम + 128GB पर्यंत स्टोरेज आहे. ही स्टोरेज डायनॅमिक टेक्नॉलॉजीद्वारे 12GB पर्यंत रॅम वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 50MP AI प्रायमरी कॅमेरा आणि 2MP इतर लेन्स आहेत. आकर्षक सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. ते चार्ज करण्यासाठी यात 15W क्विक चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo