Nokia G11 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम फीचर्स

Updated on 07-Oct-2022
HIGHLIGHTS

Nokia G11 Plus स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.

हा स्मार्टफोन Android 12 वर लाँच करण्यात आला आहे.

नोकियाच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये

Nokia ने भारतीय बाजारात Nokia G11 Plus नावाने एक नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला डिस्प्लेवर 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. याशिवाय हा फोन ब्लोटवेअर स्टॉक अँड्रॉइड 12 साठी सपोर्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, Xiaomi देत आहे 10,400 रुपयांपर्यंत सूट

NOKIA G11 PLUS ची किंमत आणि उपलब्धता

नोकिया G11 प्लस स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसह येतो, ज्याची किंमत फक्त 12,499 रुपये  आहे. हा फोन चारकोल ग्रे आणि लेक ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल. नोकियाचे म्हणणे आहे की, हे उपकरण लवकरच रिटेल आणि ऑनलाइन माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.

NOKIA G11 PLUS चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

या फोनमध्ये तुम्हाला 6.5-इंच लांबी चा HD+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट मिळत आहे, फोनचा डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेशो सह येतो. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर मिळत आहे, एवढेच नाही तर फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला मायक्रो SD कार्ड सपोर्ट मिळत आहे. म्हणजेच जर तुम्हाला फोनमधील स्टोरेज वाढवायचे असेल तर तुम्हाला ते सहज वाढवता येईल.

त्याबरोबरच, तुम्हाला फोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप मिळत असल्याची माहिती मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा मिळत आहे, जो ऑटोफोकस सह येतो. याशिवाय, तुम्हाला फोनमध्ये 2MP डेप्थ कॅमेरासुद्धा मिळत आहे. आकर्षक सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये 8MP फिक्स्ड फोकस कॅमेरा मिळेल.

याशिवाय, फोनमध्ये तुम्हाला Nokia G11 Plus स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. ही बॅटरी जवळपास 3 दिवस चालण्यास सक्षम आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. तुम्हाला या बॅटरीसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत नसला तरी फोनमध्ये तुम्हाला 10W चा नियमित चार्जर मिळत आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :