नोकिया 230 ड्यूल सिम (Internet-Enabled) फीचर फोन लाँच

Updated on 30-Dec-2015
HIGHLIGHTS

मायक्रोसॉफ्टने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 230 ड्यूल सिम फोन बाजारात आणला आहे. ह्या फोनची किंमत ३,८६९ रुपये ठेवण्यात आली आहे. आपण ह्या फोनमध्ये इंटरनेटचासुद्धा वापर करु शकतो.

इंटरनेट इनेबल फीचरसह मायक्रोसॉफ्टने आपला नवीन फीचर असलेला फोन बाजारात आणला आहे. ह्या फोनची किंमत ३,८६९ रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये आपल्याला ड्यूल सिम फीचरसह इंटरनेटसुद्धा वापरता येईल. हा आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदी करु शकता.

तथापि, आतापर्यंत हा फोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मागील महिन्यात मायक्रोसॉफ्टने सांगितले होते की, ते भारतात आपले दोन नवीन फीचर फोन नोकिया 230 आणि नोकिया 230 ड्यूल सिम लाँच करतील.

आपल्या ग्लोबल लाँचमध्ये मायक्रोसॉफ्टने ह्या नोकिया 230 आणि नोकिया 230 ड्यूल सिम फोन्सला प्रीमियम गुणवत्तेसह इंटरनेट इनेबल फीचर फोन्सचा दर्जा दिला होता. ह्या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्या फोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर आणि फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर दोघांसोबत आपल्याला LED फ्लॅश मिळत आहे. तसेच ह्याची दुसरी खास गोष्ट म्हणजे ह्याला अॅल्युमिनियमच्या कव्हरने झाकले आहे.

दोन्ही फोन्समध्ये जवळपास एकसारखे स्पेक्स आहेत. मात्र नोकिया 230 ड्यूल सिममध्ये आपल्याला दोन सिम स्लॉट मिळत आहे. जे दुस-या फोनमध्ये नाही. त्याशिवाय दोन्ही स्मार्टफोन्स मायक्रो-एसडी कार्डला सपोर्ट करतात. आणि दोन्हीही नोकियाच्या सीरिज 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. फोन्समध्ये आपल्याला आधीपासून काही प्री-लोडेड अॅप्स मिळत आहे. ज्यात बिंग सर्च आणि ओपेरा मिनी ब्राउझरसह MSN वेदर यांचाही समावेश आहे. नोेकियाच्या 230 ड्यूल सिम फोनमध्ये 2.8 इंचाची QVGA 240×320 पिक्सेलचा LCD डिस्प्ले दिला गेला आहे. त्याचबरोबर मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत आपले स्टोरेज वाढवू शकतो. त्याशिवाय कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये GPRS/EDGE, ब्लूटुथ 3.0, मायक्रो-USB आणि 3.5mm चा ऑडियो जॅक मिळत आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :