Smartphones Launch This Week
Smartphones Launch This Week: मार्च महिन्याची सुरुवात धमाकेदार झाली आहे. यंदा मोबाईल वर्ल्ड काँग्रेस MWC 2025 ने वर्चस्व गाजवले. त्याबरोबरच, पहिल्या आठवड्यात भारतात बरेच स्मार्टफोन लाँच झाले असून हा आठवडा स्मार्टफोन्सच्या नावावरच झाला आहे. तसेच, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात देखील स्मार्टफोन मार्केटमध्ये खूप गर्दी असणार आहे.
होय, या रिपोर्टमध्ये 9 मार्च ते 16 मार्च दरम्यान भारतात लाँच होणाऱ्या फोन्सबद्दल माहिती देणार आहोत. आपणा सर्वांना माहितीच आहे की, या आठवड्यात होळीचा सण देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात होळीच्या आसपास भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या मोबाईल्सची यादी-
Also Read: भारीच की! लेटेस्ट Nothing Phone (3a) सिरीजवर होईल हजारो रुपयांची बचत, पहा खात्रीची ऑफर
गेमिंग लव्हर्ससाठी IQOO Neo 10R भारतात येत्या 11 मार्च रोजी लाँच होणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसरसह लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. हा एक गेमिंग फोन असेल, व्हेपर कूलिंग चेंबरसह प्रदान केला जाईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6,400mAh बॅटरी दिली जाईल. यात 32MP सेल्फी आणि 50MP रिअर कॅमेरा असेल. फोनची किंमत आणि सर्व फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने घोषणा केली आहे की, ते त्यांच्या ‘P’ सिरीजमधील चौथा स्मार्टफोन भारतात लाँच करेल. सध्या कंपनीने लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही, पण हा फोन या आठवड्यात किंवा होळीनंतर बाजारात लाँच केला जाऊ शकतो. लीक अहवालानुसार, Realme P3 Ultra 5G मोबाईल फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. या फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम+ 256GB स्टोरेजमध्ये आणला जाऊ शकतो. हा एक मोठा बॅटरी असलेला फोन असेल जो 6,000mAh बॅटरीला सपोर्ट करू शकतो. मात्र, फोनची खरी किंमत आणि सर्व तपशील फोन लाँच झाल्यावरच समजतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo शी संबंधित ताजी बातमी पुढे आली आहे. कंपनी भारतात त्यांचा नवीन ‘A’ सीरीज फोन A5 Pro लाँच करणार आहे. हा ओप्पो मोबाईल लवकरच बाजारात येईल आणि होळीच्या आसपास त्याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या आठवड्यातच हा OPPO A5 Pro 5G फोन जागतिक बाजारात मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला होता. तर, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,800mAh बॅटरी आहे, जी पॉवर बॅकअपसाठी 45W चार्जिंगसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी 50MP रियर आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनची खरी किंमत आणि सर्व तपशील फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.