नवा Affordable स्मार्टफोन Moto G64 5G भारतात लाँच, 12GB रॅमसह जबरदस्त फीचर्स उपलब्ध। Tech News 

नवा Affordable स्मार्टफोन Moto G64 5G भारतात लाँच, 12GB रॅमसह जबरदस्त फीचर्स उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Motorola G64 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.

Moto G64 5G फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.

Moto G64 5G फोन 23 एप्रिलपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार

Motorola ने अलीकडेच अनेक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. दरम्यान, कंपनीने या यादीत आता आणखी एक नवीनतम स्मार्टफोन समाविष्ट केला आहे. होय, कंपनीने Moto G64 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. बराच दिवसांपासून या स्मार्टफोनबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. Motorola ने 12GB RAM आणि MediaTek Dimensity 7025 च्या पॉवरने सुसज्ज हा मोबाईल सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या Motorola G64 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: महागड्या Xiaomi 14 Ultra वर मिळतोय बंपर Discount, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी। Tech News

Moto G64 5G ची किंमत

Motorola Moto G64 5G
Moto G64 5G

Motorola ने Moto G64 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनच्या 8GB रॅम वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर, फोनच्या 12GB रॅम मॉडेलची किंमत 16,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीच्या सेलमध्ये HDFC कार्ड वापरकर्त्यांना फोनवर 1,000 रुपयांची सूट देखील मिळेल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G64 5G फोन 23 एप्रिलपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन मिंट ग्रीन, पर्ल ब्लू आणि आइस लिलाक कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.

Moto G64 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Moto G64 5G फोन 6.5 इंच लांबीच्या फुल HD + डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह कार्य करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Moto G64 5G फोन Android 14 वर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7025 ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रदान केले गेले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी, Moto G64 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50MP OIS सेन्सर आणि 8MP डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी हा फोन IP52 रेटिंगसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo