महागड्या Xiaomi 14 Ultra वर मिळतोय बंपर Discount, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी। Tech News 

महागड्या Xiaomi 14 Ultra वर मिळतोय बंपर Discount, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Xiaomi 14 Ultra हा कंपनीचा हाय-एंड प्रीमियम डिव्हाइस आहे.

बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 5000 रुपयांची वेगळी सूट

Xiaomi 14 Ultra फोनमध्ये फोटोग्राफीसाठी चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

Xiaomi चा Xiaomi 14 Ultra हा कंपनीचा हाय-एंड प्रीमियम डिव्हाइस आहे. जर तुम्हाला प्रीमियम फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्हाला आधी तुमचा खिसा तपासावा लागतो. पण सध्या अनेक प्रिमीयम स्मार्टफोनवर कंपन्या मोठमोठ्या सवलती ऑफर करत असता. Xiaomi 14 Ultra फोनची विक्री नुकतीच सुरू झाली आहे, आता या फोनच्या खरेदीवर 25,000 रुपयांची बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. चला तर जास्त वेळ न घालवता Xiaomi 14 Ultra वरील ऑफर्स बघुयात-

हे सुद्धा वाचा: Price Cut! 50MP प्रायमरी कॅमेरासह OnePlus 11 5G फोनच्या किमतीत पुन्हा एकदा घट, नवी किंमत साईटवर Live। Tech News

Xiaomi 14 Ultra first sale today
Xiaomi 14 Ultra

Xiaomi 14 Ultra ची किंमत

Xiaomi 14 Ultra फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,19,000 रुपये इतकी आहे. मात्र, इ-कॉमर्स साईट Flipkartवर हा स्मार्टफोन 99,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. होय, हा फोन फ्लिपकार्टवर 20,000 रुपयांच्या सवलतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनसाठी पेमेंट व्यवहार केल्यास 5000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा

Xiaomi 14 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.73 इंच लांबीचा WQHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Xiaomi 14 Ultra फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 14 Ultra मध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्याय मिळणार आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 90W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग स्पीड उपलब्ध आहे. काही मूलभूत कार्ये करताना हे बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

Xiaomi 14 Ultra
Xiaomi 14 Ultra

फोटोग्राफीसाठी, Xiaomi 14 Ultra फोनमध्ये फोटोग्राफीसाठी चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा, 50MP चा तिसरा आणि 50MP चा चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी देखील 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या युजर्ससाठी हा फ्रंट कॅमेरा अप्रतिम मानला जातो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo