VIVO V50 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अखेर आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Vivo V50 5G लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा एक प्रीमियम मोबाईल फोन आहे. या फोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती, अखेर हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन 50MP सेल्फी आणि 50MP ड्युअल रिअर कॅमेरासह येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, नवीन Vivo V50 ची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: आगामी Vivo T4X 5G चे भारतीय लाँच Confirm! नव्या स्मार्टफोनमध्ये काय मिळेल विशेष? पहा लीक्स
Vivo V50 5G फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट 34,999 रुपयांना आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 36,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मोबाईलच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB+ 512GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 40,999 रुपये आहे. हा मोबाईल रोझ रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन भारतात 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिल्या सेलदरम्यान, हा स्मार्टफोन HDFC आणि SBI बँक कार्डवर 10% सवलतीसह खरेदी करता येईल.
Vivo V50 5G फोन 2392 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.77-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही एक अल्ट्रा स्लिम क्वाड कर्व्हड स्क्रीन आहे, जी AMOLED पॅनेलवर बनवली आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा मोबाईल इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 24GB RAM पॉवर आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Vivo V50 स्मार्टफोनमध्ये Carl Zeiss लेन्स वापरण्यात आला आहे. या 5G मोबाईल फोनमध्ये एकूण तीन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. 50MP OIS मेन सेन्सर देण्यात आला आहे, त्यासोबत 50MP वाइड-अँगल लेन्स उपलब्ध आहे. हा Vivo 5G फोन AI Studio Light Portrait 2.0 Aura Light ने सुसज्ज आहे. त्याच्या फ्रंट पॅनल 50MP च्या सेल्फी सेन्सर आहे, जो ऑटो फोकस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगसह टेक्नॉलॉजीसह येते. हा Vivo 5G फोन IP68 + IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे, जो धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करतो.