आगामी Realme P3 Pro मध्ये मिळतील अत्याधुनिक फीचर्स! जाणून घ्या लाँच डेट, अपेक्षित किंमत  

HIGHLIGHTS

कंपनी आगामी Realme P3 Pro लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हा फोन या सेगमेंटमधील पहिला ग्लो-इन-द डार्क डिझाईनमध्ये येणारा स्मार्टफोन आहे.

आगामी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असेल.

आगामी Realme P3 Pro मध्ये मिळतील अत्याधुनिक फीचर्स! जाणून घ्या लाँच डेट, अपेक्षित किंमत  

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच भारतात आपला नवीन Realme P-सीरीज स्मार्टफोन्स सादर करणार, अशी माहिती दिली आहे. होय, कंपनी आगामी Realme P3 Pro लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, कंपनीने या फोनची लाँच डेट देखील कन्फर्म केली आहे. या डिव्हाइसमध्ये परफॉर्मन्स, बॅटरी लाइफ आणि गेमिंग-केंद्रित फीचर्सचे उत्तम संयोजन असेल, अशी अपेक्षा केली जात आहे. हा फोन पुढील आठवड्यात भारतीय बाजरात दाखल होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: New! आगामी iQOO Neo 10R ची किंमत लाँचपूर्वीच जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का नवा स्मार्टफोन?

Realme P3 Pro ची भारतीय लाँच डेट

Realme P3 सिरीज अधिकृतपणे 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच होणार आहे. ग्राहक Flipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून Realme P3 Pro स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, Realme ची P सिरीज भारतात बजेट रेंजमध्ये सादर केली गेली आहे.

Realme P3 Pro तीन नेब्युला ग्लो, गॅलेक्सी पर्पल आणि सॅटर्न ब्राउन कलर ऑप्शन्समध्ये मिळेल. आगामी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असेल, जो पूर्वी Realme 14 Pro+ आणि Redmi Note 14 Pro+ मध्ये दिसला होता. ग्राहक Flipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Realme P3 Pro

कंपनीने सांगितले की, आगामी Realme P3 Pro अत्याधुनिक फीचर्स आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससह त्याच्या सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा फोन पहिला क्वाड-कर्व्ह्ड एजफ्लो डिस्प्लेसह पदार्पण करेल, जो एक इमर्सिव्ह आणि व्हिज्युअली आकर्षक अनुभव देईल. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की, हा फोन या सेगमेंटमधील पहिला ग्लो-इन-द डार्क डिझाईनमध्ये येणारा स्मार्टफोन आहे.

Realme P3 Pro launch date confirmed

फोनच्या अपेक्षित स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.83 इंच लांबीच्या डिस्प्लेसह 120Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. फोटोग्राफीच्या बाबतीत, OIS सह 50MP चा प्राथमिक सेन्सर स्थिर आणि उच्च दर्जाच्या फोटोग्राफीची हमी देतो. गेमिंग उत्साही लोकांसाठी, स्मार्टफोनमध्ये AI-पॉवर्ड GT बूस्ट, AI अल्ट्रा-स्टीडी फ्रेम्स, हायपर रिस्पॉन्स इंजिन आणि AI अल्ट्रा टच कंट्रोल सारखी फीचर्स असतील, ज्यामुळे गेमिंग अनुभव अधिक सहज आणि अधिक प्रतिसादात्मक होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo