New! आगामी iQOO Neo 10R ची किंमत लाँचपूर्वीच जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का नवा स्मार्टफोन?
iQOO चा आगामी iQOO Neo 10R लवकरच भारतात लाँच होणार आहे.
iQOO Neo 10R स्मार्टफोन येत्या 11 मार्च 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे.
लाँचपूर्वीच कंपनीने iQOO Neo 10R ची किंमत जाहीर केली आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच आपल्या आगामी स्मार्टफोन iQOO Neo 10R च्या भारतीय लाँचची घोषणा केली. सध्या ऑनलाईन आणि सोशल मीडिया या स्मार्टफोनबद्दल अनेक लीक्स पुढे येत आहे. iQOO Neo 10R स्मार्टफोन येत्या 11 मार्च 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनीने लाँच होण्यापूर्वीच फोनची किंमत जाहीर केली आहे. तसेच, या स्मार्टफोनची मायक्रो वेबसाइट Amazon वर सूचीबद्ध करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात iQOO Neo 10R लाँच होण्यापूर्वीच फोनचे खास स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.
SurveyiQOO Neo 10R 5G ची अपेक्षित किंमत
स्मार्टफोन निर्माता iQOO ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून आगामी iQOO Neo 10R 5G स्मार्टफोनची किंमत जाहीर केली आहे. यासह कंपनीने AnTuTu स्टोअर लिस्टिंगची माहिती देखील दिली आहे. पोस्टनुसार, हा स्मार्टफोन त्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल हँडसेट असेल. स्मार्टफोनच्या Antutu स्टोअरची संख्या 1.7 दशलक्षाहून अधिक आहे, असे सांगण्यात आले आहे.
Are you ready to experience the Most Powerful Smartphone in the segment*? ⚡ The all-new #iQOONeo10R launches on 11th March. Get ready to push your limits!
— iQOO India (@IqooInd) February 10, 2025
Stay tuned!
Available exclusively on @amazonIN and https://t.co/bXttwlZo3N.
*Based on the AnTuTu score, as per the… pic.twitter.com/1MFMuaWNbz
तुम्ही वरील पोस्टमध्ये पाहू शकता की, या 5जी स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात येईल. तसेच, कंपनीने या पोस्टद्वारे पुष्टी केली आहे की, हा स्मार्टफोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल. तसेच, तुम्ही या पोस्टमध्ये आगामी फोनचा फोटोदेखील पाहू शकता. कंपनीने फोनच्या मूननाइट टायटॅनियम कलरला देखील टीझ केले आहे. हा स्मार्टफोन रॅगिंग ब्लू कलरमध्ये देखील लाँच केला जाईल.
iQOO Neo 10R 5G चे अपेक्षित तपशील

आगामी iQOO Neo 10R स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनचे इतर फीचर्स देखील लीक झाले आहेत. लीक रिपोर्ट्सनुसार, आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका असेल. तर, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6400mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 80W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येईल. मात्र, फोनची योग्य किंमत आणि कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile