OnePlus 13 mini: छोटा पण Powerful स्मार्टफोन लवकरच होणार लाँच! लाँच टाइमलाईन आणि फीचर्स Leak

Updated on 10-Feb-2025
HIGHLIGHTS

OnePlus ने अलीकडेच OnePlus 13 सिरीज भारतात लाँच केली.

कंपनी लवकरच या सिरीजअंतर्गत एक नवीन OnePlus 13 Mini फोन बाजारात सादर करेल.

कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये हा फोन लाँच करू शकते.

OnePlus 13 mini: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर सिरीज OnePlus ने अलीकडेच OnePlus 13 सिरीज भारतात लाँच केली आहे. दरम्यान आपण ताज्या लीक झालेल्या अहवालाबद्दल बोललो तर, कंपनी लवकरच या सिरीजअंतर्गत एक नवीन फोन बाजारात सादर करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनचे नाव OnePlus 13 Mini असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, नावाप्रमाणेच हा अनेक प्रीमियम फीचर्ससह एक मिनी साईज फ्लॅगशिप फोन असू शकतो. त्याबरोबरच, लीकनुसार फोनच्या लाँचिंग टाइमलाइन देखील शेअर करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus 13 mini चे सर्व अपेक्षित तपशील-

Also Read: तारीख नोट करा! अखेर बहुचर्चित Vivo V50 फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म, पहा अपेक्षित किंमत

OnePlus 13 mini चे अपेक्षित लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, जर लीक झालेल्या अहवालावर विश्वास ठेवायचे झाल्यास, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये जागतिक बाजारात OnePlus 13 Mini फोन लाँच करेल, अशी चर्चा सुरु आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या कंपनीने OnePlus 13 Mini शी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, अहवालात केवळ लाँचिंग टाइमलाइनच नाही तर फोनची अनेक फीचर्स देखील उघड करण्यात आली आहेत.

OnePlus 13 mini अपेक्षित तपशील

लीकनुसार, OnePlus 13 mini च्या अपेक्षित लाँच टाइमलाईनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या फोनमध्ये 6.31 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाईल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये प्रीमियम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तुम्हाला माहितीच असेल की, हा प्रोसेसर अनेक लेटेस्ट फ्लॅगशिप फोनमध्ये देण्यात आला आहे. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की हा फोन फक्त जागतिक बाजारपेठेपुरता मर्यादित असू शकतो.

फोटोग्राफीसाठी, OnePlus 13 mini फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये, 50MP प्रायमरी आणि 50MP टेलिफोटो सेन्सर मिळू शकतो. या सेन्सरमध्ये 2X ​​झूम देखील उपलब्ध असेल. सध्या फोनच्या बॅटरी क्षमतेशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल तर, हा फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो. महत्त्वाचे लक्षात घ्या की, सध्या कंपनीने OnePlus 13 Mini शी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. येत्या काही दिवसांत यासंबंधी इतर तपशील उघड होतील, अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :