Upcoming Smartphone: लोकप्रिय Honor च्या आगामी स्मार्टफोनसाठी सज्ज व्हा! Amazon वर दिसली पहिली झलक

Updated on 03-Feb-2025
HIGHLIGHTS

Honor लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज

कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात Honor 200 Lite फोन भारतात सादर केला होता.

आगामी Honor फोनची पहिली झलक देखील Amazon India वर लाईव्ह

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Honor अत्यंत मजबूत, पॉवरफुल आणि आकर्षक स्मार्टफोन्स देण्यासाठी भारतीय बाजारात प्रसिद्ध आहे. दरम्यान, Honor कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने ई-कॉमर्स साइट Amazon द्वारे नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगची पुष्टी केली आहे. या फोनची पहिली झलक देखील Amazon India वर लाईव्ह झालेल्या मायक्रोसाईटवर दिसत आहे.

टीझर पोस्टर पाहून अंदाज लावता येतो की, हा नवीन फोन गेल्या वर्षी जागतिक बाजारात लाँच झालेला Honor X9c 5G असण्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात Honor 200 Lite फोन भारतात सादर केला होता. त्यानंतर आता कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: लेटेस्ट Samsung Galaxy S25 Ultra ची पहिली सेल आज, होईल तब्बल 20,000 रुपयांपर्यंत बचत

Honor चा आगामी स्मार्टफोन

वर सांगितल्याप्रमाणे, Honor च्या नवीन स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon साईटवर लाईव्ह करण्यात आली आहे. या साईटद्वारे Honor X सीरीजच्या आगामी फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप अधिकृतपणे या फोनचे नाव उघड केलेले नाही. मात्र, टीझर पोस्टर पाहून असे गृहीत धरले जाऊ शकते की, हा फोन Honor X9c 5G फोन असू शकतो.

आगामी फोनच्या Amazon लिस्टिंगवरून असे दिसून येते की, हा फोन OIS+EIS सक्षम प्राथमिक कॅमेरासह येऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. तर, पुढील बाजूस एक कर्व डिस्प्ले देखील दिसतो.

Honor X9c 5G

वर सांगितल्याप्रमाणे, Honor X9c 5G स्मार्टफोन कंपनीने आधीच जागतिक बाजारात सादर केला आहे. त्यानुसार, स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6600mAh बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :