प्रीमियम लेदर डिझाईनसह नवा Realme P3x 5G भारतात लाँच! किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी

प्रीमियम लेदर डिझाईनसह नवा Realme P3x 5G भारतात लाँच! किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

कंपनीने आज Realme P3x 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे.

Realme P3x 5G फोन कंपनीने 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला आहे.

Realme P3x 5G फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 + IP69 रेटिंग आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच Realme P3x 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने आज Realme P3x 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. होय, कंपनीने Realme P3 Pro सह हा स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme P3x 5G फोन कंपनीने 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला आहे. या किमतीत तुम्हाला फोनमध्ये प्रीमियम डिझाईन, पॉवरफुल फीचर्स मिळतील. जाणून घेऊयात Realme P3x 5G फोनची किंमत आणि इतर सर्व स्पेसिफिकेशन्स-

Also Read: अरे व्वा! अनेक अप्रतिम AI फीचर्ससह Realme P3 Pro 5G भारतात लाँच, अंधारातही चमकेल नवा स्मार्टफोन

Realme P3x 5G ची किंमत आणि उपलब्धता

Realme P3x 5G फोनचा बेस व्हेरिएंट 13,999 रुपयांना येतो. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तर, फोनच्या टॉप 8GB रॅमसह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये येतो. ज्यामध्ये मिडनाईट ब्लू, लूनर सिल्व्हर आणि स्टेलर पिंक कलर ऑप्शन्सचा समावेश आहे.

Realme P3x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P3x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीची FHD+ 120Hz LCD स्क्रीन देण्यात आला आहे. Realme P3x 5G स्मार्टफोन प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा MediaTek Dimensity 6400 SoC द्वारे समर्थित पहिला फोन आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत RAM आणि 10GB पर्यंत व्हर्च्युअल RAM मिळेल. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 + IP69 रेटिंग आहे आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स आहे. हा फोन अँड्रॉइड 15-आधारित वन UI 6.0 वर कार्य करतो.

 Realme P3x 5G india launched in india

फोटोग्राफीसाठी, Realme P3x 5G फोनमध्ये 50MP चा रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याबरोबरच, LED फ्लॅशसह सेकंडरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीच्या शौकीन युजर्ससाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 6000mAh बॅटरी मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo