अरे व्वा! अनेक अप्रतिम AI फीचर्ससह Realme P3 Pro 5G भारतात लाँच, अंधारातही चमकेल नवा स्मार्टफोन
Realme कंपनीने नवा Realme P3 Pro स्मार्टफोन भारतात लाँच केला.
हा स्मार्टफोन ग्लो इन द डार्क डिझाईनसह येतो, ज्यामुळे फोन अंधारातील चमकेल.
Realme P3 Pro 5G फोनमध्ये अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच आपल्या दोन नवीन स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने भारतीय बाजारात Realme P3 Pro आणि Realme P3x 5G स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Realme P3 सिरीज हे दोन्ही स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Realme P3 Pro 5G फोनबद्दल माहिती देणार आहोत. हा फोन कंपनीने मिड-बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. चला तर मग जाणून घेउयात Realme P3 Pro 5G ची किंमत, उपलब्धता आणि संपूर्ण तपशील-
Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Realme 14 Pro+ 5G वर मोठी सूट, मिळेल 4000 रुपयांचा Discount
Realme P3 Pro 5G ची किंमत
Moves out of this world, just like the #realmeP3Series!🚀
— realme (@realmeIndia) February 13, 2025
With glow-in-the-dark design, multicolor shades, and insane power, this phone is truly a multitasking beast!
Search #realmeP3Pro5G & #realmeP3x5G on @Flipkart to know more:https://t.co/p9FT51EBa0https://t.co/fTFutAUyxU
Realme P3 Pro 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. त्याच वेळी, 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 24,999 रुपयांना आणण्यात आला आहे. या फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 26,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल.
Realme P3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme P3 Pro 5G फोन 6.83-इंच लांबीच्या 1.5k डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही एक क्वाड वक्र स्क्रीन आहे, जी AMOLED पॅनेलवर बनवली आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. या मोबाईलमध्ये वेट टच टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे ओल्या हातांनीही फोन वापरता येईल. प्रोसेसिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 ऑक्टा-कोर आहे.
फोटोग्राफीसाठी Realme P3 Pro ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP चा मुख्य लेन्स आहे, जो सोनी IMX896 सेन्सर आहे. यासोबतच, मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2MP चा सेकंडरी लेन्स देखील उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 16MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा सोनी IMX480 सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोन 6000mAh क्षमतेच्या शक्तिशाली बॅटरीने सुसज्ज आहे. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी, मोबाईलमध्ये 80W ची फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
विशेष फीचर्स
Realme P3 Pro 5G ग्लो-इन-द-डार्क डिझाईनसह येईल, ज्याद्वारे फोन अंधारात चमकेल. मोबाईल गेमिंग दरम्यान हा फोन थंड ठेवण्यासाठी या फोनमध्ये 6050mm2 व्हेपर चेंबर आहे. त्याबरोबरच, Realme P3 Pro फोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी आहे. ज्याद्वारे वापरकर्त्यांना AI इरेज, बेस्ट फेस, मोशन डिबलर, AI रेकॉर्डिंग समरी, AI रायटर, गुगल सर्कल टू सर्च आणि AI रिप्लाय सारख्या फीचर्सचे समर्थन आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile