नुकतेच बार्सिलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस म्हणेजच MWC 2025 मध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने एक नवीन इंटरचेंजेबल-लेन्सची संकलपना सांगितली आहे. फोटोग्राफी प्रेमींसाठी ही एक महत्त्वाचे अपडेट आहे की, नवीन कॅमेरा टेक्नोलोंजि सध्या एक प्रोटोटाइप आहे. होय, आता वापरकर्त्यांना डिजिटल सिंगल-लेन्स रिफ्लेक्स (DSLR) लेन्स थेट स्मार्टफोनवर बसवण्याची परवानगी देईल. हे वाचून तर तुमच्या अंगात नक्कीच एक वेगळा उत्साह संचारला असेल.
Also Read: आगामी लाँचच्या तोंडावरच Nothing Phone 2a वर धमाकेदार ऑफर! किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी
पुढे आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनद्वारे फोटोज कॅप्चर करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक सुधारणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे. एवढेच नाही तर, नवीन लेन्स सिस्टमसह Realme ने काही नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) इमेजिंग फीचर्स देखील टीझ केले आहेत. जे कंपनी लवकरच स्मार्टफोन आणि इतर उपकरणांमध्ये सादर करू शकते.
चिनी स्मार्टफोन निर्माता Realme ने त्यांच्या नवीन इंटरचेंजेबल लेन्सबद्दल अनेक प्रकारची माहिती उघड केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला एक वेगळा लेन्स तुमच्या फोनच्या कॅमेरामध्ये फिक्स करता येईल. होय, तुमच्या बिल्ट इन कॅमेरा लेन्ससह तुम्ही स्मार्टफोनसह DSLR लेन्स बसवण्यास सक्षम असणार आहात. दरम्यान, फोटोग्राफीसाठी DSLR बेस्ट आहे, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. यासह तुमचे फोटोग्राफी स्किल्स आणि फोटोग्राफी वेगळ्याच स्तरावर जाऊन बसेल, हे निश्चित आहे.
सविस्तर बोलायचे झाल्यास, इंटरचेंजेबल-लेन्सची संकल्पना एक प्रोटोटाइप डिव्हाइस आहे, ज्यामध्ये 1-इंच लांबीचा कस्टमाइज्ड सोनी सेन्सर आणि मालकीची लेन्स माउंट सिस्टम उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हीच प्रणाली सुसंगत स्मार्टफोनच्या कॅमेरा मॉड्यूलशी पेयर केली जाऊ शकते.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, नुकतेच झालेल्या MWC 2025 मध्ये Realme ने दोन लेन्स प्रदर्शित केले आहेत, ज्यात 73mm पोर्ट्रेट लेन्स आणि 234mm टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. या लेन्स माउंट्सद्वारे वापरकर्ते व्यावसायिक बोकेह शॉट्स आणि लॉसलेस 10x झूमसह सर्वात अप्रतिम फोटोग्राफी करू शकतील, असा कंपनीचा दावा आहे.
नव्या कॅमेरा अपडेटसह प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताने नवीनतम AI इमेजिंग फीचर्स देखील सादर केले आहेत. हे AI फीचर्स तुमचे फोटोज आणि व्हीडिओ एडिट करण्याचे काम आणखी सोपे करणार आहेत. सादर केलेल्या नव्या फीचर्स पैकी विशेष फिचर म्हणजे AI व्हॉइस बेस्ड रिटचर होय. याद्वारे तुम्ही तुमचं आवाजाने म्हणजेच व्हॉइस कमांड देऊन तुमची फोटो तुम्हाला हवी तशी कस्टमाइज करू शकता. जसे की, पार्श्वभूमी बदलणे, किंवा एखाद्या विशिष्ट देखाव्याचा रंग बदलणे, इ. कामे तुम्ही या नव्या फिचरसह करू शकता.