Motorola Edge 60 Stylus ची पहिली सेल भारतात सुरु! मिळतो S-Pen सारखा स्टायलस, पहा ऑफर्स

Updated on 23-Apr-2025
HIGHLIGHTS

Samsung ने अलीकडेच भारतात Samsung Galaxy M56 5G फोन लाँच केला.

आज Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनची भारतात पहिली सेल आहे.

Samsung Galaxy M56 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Motorola ने मागील आठवड्यात भारतीय बाजारात आपला नवा फोन Motorola Edge 60 Stylus लाँच केला. त्यानंतर, आज म्हणजेच 23 एप्रिल 2025 रोजी या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची पहिली सेल दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर लाईव्ह झाली आहे. सेलदरम्यान फोनवर स्वस्त EMI आणि बँक डिस्काउंट उपलब्ध असेल.

या फोनमध्ये ग्लान्स AI आणि जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. तसेच, विशेष म्हणजे या मध्यम श्रेणीच्या फोनमध्ये तुम्हाला स्टायलसचा सपोर्ट देखील मिळणार आहे. पाहुयात Motorola Edge 60 Stylus फोनची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Samsung Galaxy M56 5G ची पहिली सेल! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह मिळतील अनेक फीचर्स

Motorola Edge 60 Stylus ची किंमत आणि ऑफर्स

Motorola Edge 60 Stylus ची किंमत 22,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या किमतीत फक्त 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या डिव्हाइसवर दरमहा 1,127 रुपयांचा स्टॅंडर्ड EMI दिला जात आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Motorola Edge 60 Stylus फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा 1.5k रिझोल्यूशनचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर कार्य करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या मागील बाजूस व्हेगन लेदर फिनिशसह बॅक पॅनल आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen2 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये Glance AI चा सपोर्ट देखील आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP चा Sony Lytia 700C सेन्सर आहे. त्याबरोबरच, 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील दिला आहे. त्यात मोटो एआयची सुविधा आहे. सेल्फीसाठी, या हँडसेटच्या समोर 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये नाईट, पोर्ट्रेट, लाईव्ह आणि टाइम-लॅप्स सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.

बॅटरी

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायरलेस चार्जिंगद्वारे समर्थित आहे. वेब सर्फिंगसारख्या मूलभूत कार्यांसह ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

अन्य

चांगल्या आवाजासाठी, फोनमध्ये डॉल्बी ATMOS सह स्टीरिओ स्पीकर्स आहेत. त्याबरोबरच, या डिव्हाइसला पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी IP68 रेटिंग देखील मिळाले आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :